प्रशासन मॅनेजमेंटपेक्षा महाविकास आघाडी एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त, आठवलेंचा पुन्हा खोचक टोला

महाविकास आघाडीवर टीका करताना रामदास आठवले म्हणले, हे सरकार मॅनेजमेंट चांगलं करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहेत. सरकारकडून विकास कामांबाबत योग्य आढावा घेतला जात नाही.

प्रशासन मॅनेजमेंटपेक्षा महाविकास आघाडी एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त, आठवलेंचा पुन्हा खोचक टोला
रामदास आठवलेंनी पुन्हा महाविकास आघाडीला डिवचलं
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 7:21 PM

औरंगाबाद : कालच केसीआर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर टीका केल्यानंतर आज पुन्हा आठवलेंनी (Ramdas Athawle) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टार्गेट केले आहे. महाविकास आघाडीवर टीका करताना रामदास आठवले म्हणले, हे सरकार मॅनेजमेंट चांगलं करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहेत. सरकारकडून विकास कामांबाबत योग्य आढावा घेतला जात नाही. सरकार पाडण्याचा आमचा मानस नाही, त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांचे आरोप निरर्थक आहेत. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर चुकीचा होत नाही, मोदी सरकारला अशा छोट्या चौकशी करण्याची गरज नाही. केंद्र विकास आराखडा घेऊन पुढे जात आहे.आमचे सरकार मुद्दाम कोणाला त्रास देणार नाही, असे म्हणत त्यांनी मोदी आणि भाजपची पाठराखण केली आहे. राज्यात सध्या जे जोरदार तू तू मै मै सुरू आहे, त्यावर केंद्रीय मंत्री रामदार आठवले बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी राऊतांना समज द्यावा

राज्यात सध्या सुरू असलेले भांडण मिटलं पाहिजे असे आम्हाला वाटतं, उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा आणि संजय राऊत यांना समज द्यावा, असा सल्लाही यावेळी आठवलेंनी दिला आहे. तसेच शिवसेना-भाजप एकत्र आले पाहिजे. दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. जुन्या फार्मुल्यावर एक असल्यास भाजप देखील तयार होईल, असे पुनरुच्चार आठवलेंनी केलाय. ठोस पुरावे नसताना आरोप करू नये, राणे यांच्या घरावर कारवाई करणारे अधिकारी इतके वर्ष झोपले होते का? सूडाची भूमिका असू नये. कंगना रानावत यांचे कार्यालय देखील तोडण्यात आले होते. आरोप शिवसेनेकडून होत आहेत त्याला भाजप उत्तर देत आहेत, असेही आठवले म्हणाले.

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता

सध्या पाच राज्यात निवडणुका आहेत यावर बोलताना आठवले म्हणाले, उत्तर प्रदेश मध्ये भाजपाला तीनशेपेक्षा जास्त जागा मिळतील. आम्ही उमेदवार उभे केले नाही. आमचा भाजपलं पाठिंबा आहे. दलित मतांवर मायावतीनाच फक्त अधिकार नाही. ऐक्यासाठी पुढे आले पाहिजे, दलित पँथरची स्थापना नव्याने करण्याची गरज आहे, सत्तेत येणाची इच्छा प्रत्येकला असते मात्र तशी ताकद निर्माण झाली पाहिजे. विखूरलेला समाज एकवटण्याची गरज आहे, असे मत आठवलेंनी व्यक्त केले आहे. तसेच बसपाचा जनाधार कमी होत आहे.असेही आठवले म्हणाले. तसेच प्रकाश आंबेडकरांनी गांभीर विचार केला पाहिजे. मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही, जिंकून येणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकर यांना शुभेच्छा मात्र जागा निवडणून आणल्या नाहीत, बाबासाहेबांनी सुरु केलेला रिपब्लिकन पक्ष व्यापक करण्याची गरज आहे. एकच लक्ष रिपलिकन पक्ष असा निरा दिला पाहिजे, प्रकाश आंबेडकर सोबत आल्याशिवाय ऐक्य शक्य नाही, असेही ते म्हणाले.

मराठी भाषा दिनावरुन विनोद तावडेंचा शिवसेनेला टोला, तर राऊतांच्या भाषेमुळे महाराष्ट्र बदनाम होत असल्याची टीका

प्रियांका गांधी दुसरी इंदिराच, लडकी हूँ, लड सकती हूँ नारा देशव्यापी-यशोमती ठाकूर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आराखडा तातडीने सादर करा, जयंत पाटलांचे कुणाला आदेश?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.