Raosaheb Danve : महाराष्ट्रात आणीबाणी सदृश्य परिस्थिती, केंद्रीय मंत्री दानवेंचं मोठं विधान; भाजपच्या मनात नेमकं काय?

रावसाहेब दानवे म्हणाले, पोलिसांना पुढं करून राजकारण करण्याचा धंदा सुरू केलाय. पोलिसांना बदनाम करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करतंय. त्यांनी मातोश्रीवर जायला हवं, या मताचे आम्ही नाही. पण सरकारच्या प्रतिनिधींनी जायला हवं, त्यांची समजून काढायला हवी होती.

Raosaheb Danve : महाराष्ट्रात आणीबाणी सदृश्य परिस्थिती, केंद्रीय मंत्री दानवेंचं मोठं विधान; भाजपच्या मनात नेमकं काय?
रावसाहेब दानवे.
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 5:45 PM

औरंगाबादः महाराष्ट्रात (Maharashtra) आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किरीट सोमय्या यांच्या ड्राइव्हरवर गुन्हा दाखल झाला. मात्र, शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला नाही. बॉम्बस्फोटावेळी देखील महाराष्ट्रात जेवढी परिस्थिती खराब झाली नव्हती, तेवढी परिस्थिती आज खराब झाली आहे, असे विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपच्या मनात नेमके काय सुरू आहे, याची चर्चा सुरू झालीय. शिवसेनेसह विरोधी पक्षांनी भाजपचा (BJP) महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचा मनसुबा आहे, असे आरोप यापूर्वीच करण्यात आले आहेत. त्यासाठीच महाराष्ट्रातील परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू झालीय.

शिवसैनिकांनी दबाव निर्माण केला

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, महाराष्ट्रात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किरीट सोमय्या यांच्या ड्राइव्हरवर गुन्हा दाखल झाला. मात्र, शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला नाही. बॉम्बस्फोटावेळी देखील महाराष्ट्रात जेवढी परिस्थिती खराब झाली नव्हती, तेवढी परिस्थिती आज खराब झाली आहे. राणा कुटुंबाच्या घराबाहेर असलेले शिवसैनिक पोलिसांनी हटवले नाहीत. आंदोलकांशी सरकारचे प्रतिनिधी जाऊन चर्चा करतात, पण राणा दाम्पत्यांशी केली नाही. उलट शिवसैनिक पाठवून दबाव निर्माण केला जात आहे. राणा दाम्पत्याना अटक केली जाते, पण राणा कुटुंबाच्या घराबाहेर असलेले शिवसैनिक पोलिसांनी हटवले नाहीत, अशा आरोपांच्या फैरीही दानवे यांनी झाडल्या.

पोलिसांना पुढं करून राजकारण

रावसाहेब दानवे म्हणाले, पोलिसांना पुढं करून राजकारण करण्याचा धंदा सुरू केलाय. पोलिसांना बदनाम करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करतंय. त्यांनी मातोश्रीवर जायला हवं, या मताचे आम्ही नाही. पण सरकारच्या प्रतिनिधींनी जायला हवं, त्यांची समजून काढायला हवी होती. अण्णांची जशी सरकारनं समजून काढली होती, तशी समजून काढता आली असती. पण गुंडगिरी करुन त्यांचा डाव हाणून पाडलं, महाराष्ट्राला हे शोभनीय नाही.

इतर बातम्याः

Amravati Shiv Sena | राणांचे हनुमान चालीसा वाचन स्थगित, अमरावतीत फटाके फोडून शिवसैनिक परतले

Sanjay Raut | खासदार बाई यांचा हिंदुत्वाचा संबंध काय? संजय राऊत यांचा नवनीत राणा यांच्यावर घणाघात

Amravati Shiv Sainik | रवी राणांचा घरावर दगडफेक केल्याचा आरोप; अमरावतीत शिवसैनिक आक्रमक

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.