Video | रोडरोमिओंकडून पाठलाग, अश्लील हावभाव; धाकट्या बहिणीने भर रस्त्यात दिला चोप, व्हिडीओ व्हायरल

लहान बहिणीने या रोडरोमिओंना चांगलाच चोप दिला. शहरातील सूतगिरणी चौकात हा प्रकार घडला. धाकट्या बहिणीची ही जिगरबाज कामगिरी मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.

Video | रोडरोमिओंकडून पाठलाग, अश्लील हावभाव; धाकट्या बहिणीने भर रस्त्यात दिला चोप, व्हिडीओ व्हायरल
AURANGABAD VIDEO
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 10:24 PM

औरंगाबाद : आपल्या मोठ्या बहिणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना धाकट्या बहिणीने चांगलाच धडा शिकवला आहे. हे भामटे तासाभरापासून पाठलाग करुन या दोन बहिणींकडे पाहून अश्लील हावभाव करत होते. ही बाब समजताच लहान बहिणीने या रोडरोमिओंना चांगलाच चोप दिला. शहरातील सूतगिरणी चौकात हा प्रकार घडला. धाकट्या बहिणीची ही जिगरबाज कामगिरी मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. (Road romeo beaten by younger sister in Aurangabad video went viral on social media)

नेमका प्रकार काय ?

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादमध्ये दोन बहिणी काही कामानिमित्त बाहेर पडल्या होत्या. यावेळी दोन रोडरोमिओ त्यांचा पाठलाग करत होते. त्यानंतर शहरातील सुतगिरणी परिसरात आल्यानंतर या बहिणींमधील मोठ्या बहिणीला हे रोडरोमिओ इशारे करत होते. तसेच मागील दोन तासांपासून पाठलाग करताना अश्लील हावभावही करत होते.

रोडरोमिओंची चांगलीच धुलाई केली

हा प्रकार समजल्यानंतर यातील धाकटी बहीण चांगलीच भडकली. रणरागिणीचा अवतार धार करीत लहान बहिणीने या रोडरोमिओंना चांगलेच चोपले. दोघांचीही या लहान बहिणीने चांगलीच धुलाई केली.

पाहा व्हिडीओ :

धाकट्या बहिणीचे कौतूक, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, हा प्रकार घडत असताना बघ्यांची गर्दी होत होती. त्यानंतर घाबरून हे दोन्ही रोडरोमिओ दुचाकी जागेवरच सोडून पळून गेले. हा प्रकार घडल्यानंतर बघ्यांनी तसेच इतर नागरिकांनी धाकट्या बहिणीचे कौतूक केले. तसेच टवळखोर तरुणांना अशाच प्रकारचा धडा शिकवायला हवा अशी प्रतिक्रियाही काही लोकांनी दिली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांचं महिला सहकाऱ्यासोबत लिप लॉक, किसिंगचा व्हिडीओ जगभरात व्हायरल

Video | भर रस्त्यात तरुणाकडून किसची मागणी, चिडलेल्या तरुणीने पुढे काय केले ? पाहा व्हायरल व्हिडीओ

Video : नाचता-नाचता खाली पडली पॅंट, पुढे जे झाले ते पाहून व्हाल लोट-पोट

(Road romeo beaten by younger sister in Aurangabad video went viral on social media)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.