शिवसेना-भाजपच्या मैत्रीसाठी संजय राऊतांना भेटणार, मंत्री रामदास आठवलेंचं औरंगाबादेत वक्तव्य!

शिवसेनेच्या भविष्याचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करून शिवसेनेने भूमिका बदलली पाहिजे. यासाठी मीसुद्धा प्रयत्न करणार आहे. मी संजय राऊत यांच्याशी बोलणार आहे. या स्थितीत काही बदल व्हावा, यासाठी मी आग्रही आहे, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं.

शिवसेना-भाजपच्या मैत्रीसाठी संजय राऊतांना भेटणार, मंत्री रामदास आठवलेंचं औरंगाबादेत वक्तव्य!
Ramdas Athavale
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 1:14 PM

औरंगाबादः केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) हे दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद तसेच मराठवाड्यातील(ZP Elections) आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महापालिका निवडणुकांच्या (Municipal corporation Elections) पार्श्वभूमीवर आरपीआय कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी आयोजित केली आहे. आगामी निवडणुकीतील पक्षाची रणनिती ठरवण्यासाठी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी टीव्ही 9 प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. शिवसेना आणि भाजपच्या युतीसाठी आपण पुढाकार घेणार असून लवकरच या संदर्भाने शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच महापालिका निवडणुकांमध्ये आरपीआय भाजपसोबत निवडणुक लढवणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

RPI भाजपसोबत निवडणूक लढवणार- रामदास आठवले

आगामी निवडणुकांमध्ये आरपीआयची काय भूमिका असेल असा प्रश्न विचारला असता रामदास आठवले म्हणाले, मराठवाड्याच्या पक्षातील कार्यकर्त्यांची या संदर्भात आम्ही महत्त्वाची बैठक ठेवली आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये तसेच मराठवाड्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आता कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करूनच आम्ही निवडणूक लढणार आहोत. याविषयी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाला पाठींबा देणार की स्वतः उमेदवार उभे करणार, असा प्रश्न रामदास आठवले यांना विचारला असता, आम्ही काही जागा भाजपकडून मागून घेऊ, त्या ठिकाणी आरपीआयचे उमेदवार उभे करू, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

वंचित बहुजन आघाडीमुळे फटका बसला का?

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीमुळे आरपीआयला फटका बसला का, असा प्रश्न विचारला असता रामदास आठवले म्हणाले, वंचित बहुजन आघाडीमुळे आम्हाला फटका बसण्याचं कारण नाही. काही आंबेडकरी मतदार, रिपब्लिकन मतदार आम्हाला मतदान करतातच. त्यामुळे आम्हाला फटका बसण्याचं कारण नाही. आमची मतं आणि भाजपची मतं एक झाली की आमच्या पक्षाला फार काही फटका बसण्याची शक्यता नाही. वंचित बहुजन आघाडीला मागील लोकसभेला 42 लाख, नंतर विधानसभेला 24 लाख मिळाली, त्यामुळे काही प्रमाणात मतं वळली हे खरं आहे. पण मोठ्या प्रमाणावर असं नाही. भाजप आणि शिवसेनेला लोकसभेत मोठ्या प्रमाणावर दलित मतं मिळाली आहेत. वंचितच्या ज्या उमेदावारांना मतं मिळाली आहेत, ती त्यांच्या जातीची मतं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्या मताधिक्य वाढलं असलं तरी त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करत आहोत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेरलेले मुख्यमंत्री- आठवले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या कामगिरीचं मूल्यांकन कसं कराल, असा प्रश्न विचारला असता, रामदास आठवले म्हणाले, मुख्यमंत्र्यांची अनेकदा तब्येत ठिक नसते. अनेक वेळ आजारी असतात. निर्णय घेता येत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घेरलेलं आहे. त्यामुळे त्यांना जे निर्णय घ्यायचे होते, ते होऊ शकले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्युहातून बाहेर पडणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

भाजप-शिवसेना मैत्रीसाठी राऊतांना भेटणार- आठवले

दरम्यान, महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला पाहिजे, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली. ते म्हणाले, शिवसेनेने भाजपसोबत मैत्री केली पाहिजे. शिवसेनेच्या भविष्याचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करून शिवसेनेने भूमिका बदलली पाहिजे. यासाठी मीसुद्धा प्रयत्न करणार आहे. मी संजय राऊत यांच्याशी बोलणार आहे. या स्थितीत काही बदल व्हावा, यासाठी मी आग्रही आहे.

इतर बातम्या-

राज्यात 2 लाख कोटींची नवी गुंतवणूक होतेय, 3 लाख तरुणांना रोजगार मिळणार; सुभाष देसाईंची ‘टीव्ही9 मराठी’च्या कन्क्लेव्हमध्ये घोषणा

Iron : रक्तातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.