Shirdi Saibaba | साईबाबा मंदिराच्या विश्वस्त मंडळाला अखेर दणका, हायकोर्टाने सरकारला काय दिले निर्देश

Shirdi Saibaba | शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिराच्या विश्वस्त मंडळाला अखेर दणका बसला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विश्वस्त मंडळ बरखास्तीचे निर्देश दिले आहेत.

Shirdi Saibaba | साईबाबा मंदिराच्या विश्वस्त मंडळाला अखेर दणका, हायकोर्टाने सरकारला काय दिले निर्देश
हायकोर्टाने साईबाबा संस्थान समिती केली बरखास्तImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 11:56 AM

Shirdi Saibaba | शिर्डी येथील श्री साईबाबा (Shirdi Saibaba) मंदिराच्या विश्वस्त मंडळाला (Board of Trustees) अखेर हायकोर्टाने दणका दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे (Bombay High Court of Aurangabad Bench) न्या. आर. डी. धानुका आणि न्या. एस. जी. मेहरे यांनी मंगळवारी, 13 सप्टेंबर रोजी विश्वस्त मंडळ बरखास्तीचे आदेश दिले.

कधी नेमले विश्वस्त मंडळ

तत्कालीन आघाडी सरकारने 16 सप्टेंबर 2021 रोजी 12 सदस्यांचे नवीन विश्वस्त मंडळ नेमले. त्यात आशुतोष काळे अध्यक्ष आणि अ‍ॅड. जगदीश सावंत उपाध्यक्ष होते. या समितीत 9 सदस्य आणि एक पदसिद्ध सदस्य होता.

काय होता आक्षेप

हे विश्वस्त मंडळ साईबाबा संस्थान कायदा 2004, विश्वस्त नेमणूक नियम 2013 आणि उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे पालन न करता अस्तित्वात आले आहे. त्यांची नेमणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

17 पैकी 12 सदस्यांची नेमणूक

तत्कालीन राज्य शासनाने 17 पैकी 12 सदस्यांची नेमणूक केली. विश्वस्त मंडळ नेमणूक नियमावलीच्या ‘क’ प्रमाणे नेमणूक नसल्याचे याचिकेत म्हणणे मांडण्यात आले.

नियम बसवले धाब्यावर

मंडळात आर्थिक व मागास प्रवर्गातील सदस्य नाही, वैद्यकीय अथवा औषधी निर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्य नाही. आर्थिक व्यवस्थापन, वित्तीयधोरण, लेखा परीक्षण क्षेत्रातील तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली नाही.

स्थगिती द्या अथवा बरखास्त करा

8 व्यक्तींपैकी केवळ 5 तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली. या नेमणूक कायद्याला धरून नाहीत. त्यामुळे नव्या विश्वस्त समितीला स्थगिती द्यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.

कोणी केली याचिका

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका (क्रं.98/2021) दाखल केली होती. अॅड. सतिश तळेकर, अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर आणि अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी त्यांची बाजू मांडली. यावर्षी एप्रिल महिन्यात सदर याचिका निकालासाठी राखून ठेवण्यात आली होती.

'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.