Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संत एकनाथ रंगमंदिर नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरु होणार, औरंगाबादच्या रसिकांना नाट्यप्रयोगांची उत्सुकता

औरंगाबादः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून सिनेमागृह आणि नाट्यगृहे (Theaters) बंद आहेत. त्यामुळे अनेक नाट्य कलावंतांवर (Artist) आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांना या काळात वेगळ्या क्षेत्राची वाट धरावी लागली. मात्र आता राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत नाट्यगृहे सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून नाट्यगृहातील पडदा उघडणार आहे. दरम्यान गेल्या चार वर्षांपासून नूतनीकरण होत […]

संत एकनाथ रंगमंदिर नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरु होणार, औरंगाबादच्या रसिकांना नाट्यप्रयोगांची उत्सुकता
नोव्हेंबरअखेरपर्यंत संत एकनाथ रंगमंदिराचे नूतनीकरण पूर्ण होण्याचा अंदाज
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 4:29 PM

औरंगाबादः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून सिनेमागृह आणि नाट्यगृहे (Theaters) बंद आहेत. त्यामुळे अनेक नाट्य कलावंतांवर (Artist) आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांना या काळात वेगळ्या क्षेत्राची वाट धरावी लागली. मात्र आता राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत नाट्यगृहे सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून नाट्यगृहातील पडदा उघडणार आहे. दरम्यान गेल्या चार वर्षांपासून नूतनीकरण होत असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराचा (Sant Eknath Rang Mandir) पडदादेखील नोव्हेंबरअखेरपर्यंत उघडेल, अशी माहिती वॉर्ड अभियंता बी.के. परदेशी (B.K.Pardeshi) यांनी दिली.

4 वर्षांपासून एकनाथ रंगमंदिराचे नूतनीकरण

उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदिराचे नूतनीकरण मागील चार वर्षांपासून सुरु आहे. यासाठी 8 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली आहे. सध्या शहरातील दोनच नाट्यगृहे सुरु असून त्यातही 50 टक्क्यांची अट आहे. अशसा स्थितीत संत एकनाथ रंगमंदिराचा पडदा कधी उठणार, असा प्रश्न रसिकांना पडला आहे.

तापडिया नाट्यमंदिरात नाटकांची मेजवानी

नाट्यगृहे सुरु झाल्यानंतर सध्या महिन्यातून दहा ते बारा बुकिंग होत असल्याचे तापडिया नाट्यमंदिराचे व्यवस्थापक राव यांनी सांगितले. 12 नोव्हेंबरला उमेश कामत यांचे ‘दादा एक गुड न्यूज,’ 27 नोव्हेंबर रोजी प्रशांत दामले यांची ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, डिसेंबरमध्ये ‘तू म्हणशील तसं’ आदी नाटके सादर होणार असल्याचे संदीप सोनार यांनी सांगितले. नोव्हेंबर महिन्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ऑर्केस्ट्रा, परिषद, दिवाळी स्नेहसंमेलन आदी दहा-बारा कार्यक्रमांचे बुकिंग झालेले आहे.

100 टक्के उपस्थितीला परवानगी देण्याची मागणी

शहरात नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांसाठी मर्यादा घालण्यात आली आहे. येथे फक्त 50 टक्केच रसिक प्रेक्षक उपस्थित राहू शकतील, अशी राज्य शासनाने अट घातली आहे. ही अट शासनाने लवकरात लवकर शिथिल करावी, अशी मागणी व्यवस्थापकांकडून करण्यात येत आहे.

इतर बातम्या-

आता 1000 च्या पुढच्या लाखो रुपयांच्या लडींचे करायचे काय? जिल्हाधिकाऱ्यांच्या ऐनवेळच्या बंदीने व्यापाऱ्यांसमोर संकट

औरंगाबादेत मिटमिटा रस्त्यावर दोघांचा मृत्यू, विनादुभाजकाचा दुपदरी रस्ता आणखी किती जणांचे बळी घेणार?

दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.