इथे दादागिरी खपवून घेणार नाही, औरंगाबादेत गुंठेवारी कारवाईच्या इशाऱ्यावरून शिवसेना आक्रमक
औरंगाबादः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औंरंगाबादेत शिवसेनेने (Aurangabad Shivsena) व्यापक स्तरावर आक्रमक अभियान राबवण्याची योजना आखली आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना मालमत्ता नियमितीकरणासाठी (Property regularization) पैसा जमवणे सध्या तरी कठीण आहे. त्यातच सणासुदीला मालमत्तांवर बुलडोझर चालवण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. शहरात अशा प्रकारे कुणाचीही दादागिरी चालवू देणार नाही, असा इशारा आमदार संदय शिरसाट […]
औरंगाबादः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औंरंगाबादेत शिवसेनेने (Aurangabad Shivsena) व्यापक स्तरावर आक्रमक अभियान राबवण्याची योजना आखली आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना मालमत्ता नियमितीकरणासाठी (Property regularization) पैसा जमवणे सध्या तरी कठीण आहे. त्यातच सणासुदीला मालमत्तांवर बुलडोझर चालवण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. शहरात अशा प्रकारे कुणाचीही दादागिरी चालवू देणार नाही, असा इशारा आमदार संदय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शनिवारी औरंगबाादेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या संपर्क कार्यालयात शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदू घोडेले, आदींची उपस्थिती होती.
गुंठेवारी कारवाईसाठी सहा महिन्यांची मुदत द्या
पत्रकार परिषदेत आमदार संजय शिरसाट म्हणाले, कोव्हिड महामारीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले, नोकऱ्या गेल्या. त्यामुळे गुंठेवारी वसाहतीत राहणाऱ्या गरीब नागरिकांची आर्थिक परिस्थिती गुंठेवारीअंतर्गत घरे नियमित करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नाहीत, ही बाब लक्षात घेऊन शहरातील गुंठेवारी वसाहतीतील घरे नियमित करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. घरावर बुलडोझर फिरवणार असा इशारा महापालिकेने दिला आहे. मात्र अशी कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
13 नोव्हेंबर रोजी इंधनदरवाढीविरोधात मोर्चा
कालच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेने 13 नोव्हेंबर रोजी इंधन दरवाढीविरोधात मोर्चा काढणार असल्याचेही सांगितले. स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढतच आहेत. वाढत्या महागाईसाठी केंद्र सरकार जबाबदार असून केंद्राविरोधात शिवसेनेने 13 नोव्हेंबर रोजी शहरात मोर्चाची हाक दिली आहे. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे. तसेच शहरातील गुंठेवारीवरून भाजपने रान पेटवण्याचा प्रयत्न केला. याविरोधातही शिवसेना पोलीसात जाणार असल्याची माहिती काल पत्रकार परिषदेत देण्यात आली.
‘ध्वज दिवाळी अभियाना’तून शक्तीप्रदर्शन
दिवाळीदरम्यान शहरात शिवसेना शक्तीप्रदर्शन करणार आहे. येत्या 1 ते 3 नोव्हेंबरदरम्यान शहरातील 50 हजार घरांवर भगवा ध्वज फडकवण्याचे आवाहन शिवसेनेने केले आहे. याद्वारे एक जागतिक विक्रम करण्याचा निश्चय शिवसेनेने केला आहे.
इतर बातम्या-