प्रत्येकाला धान्य मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करुन अन्नधान्य पुरवठा करा;अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

दिव्यांग, अनाथ, तृतीय पंथीय आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना रेशन दुकानातून धान्य वाटप करण्यासाठी जिल्ह्यात अंत्योदय योजनेसाठी 1664 कार्ड धारक तर प्राधान्य लाभार्थी योजनेसाठी 57 हजार लाभार्थींचा नवीन इष्टांक मंजूर करण्यात आला

प्रत्येकाला धान्य मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करुन अन्नधान्य पुरवठा करा;अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
प्रत्येकाला धान्य मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करणार: छगन भुजबळImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 7:56 PM

औरंगाबाद: दिव्यांग, अनाथ, तृतीय पंथीय आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना रेशन दुकानातून धान्य वाटप करण्यासाठी जिल्ह्यात अंत्योदय योजनेसाठी (Antyodaya Yojana) 1664 कार्ड धारक तर प्राधान्य लाभार्थी योजनेसाठी 57 हजार लाभार्थींचा नवीन इष्टांक मंजूर करण्यात आला असून त्यांना स्वस्त धान्याचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी पुरवठा उपायुक्त वामन कदम, जिल्हा पुरवठा (Supply officer) अधिकारी आप्पासाहेब शिंदे, वैधमापन विभागाचे सहनियंत्रक चाटे, उपनियंत्रक रमेश दराडे, जिल्हा पणन अधिकारी श्रीमती पांडो आढावा बैठकीस उपस्थित होते.

स्वच्छतेबाबत नियमित तपासणी

शिवभोजन केंद्रातून जिल्ह्यात प्रतिदिन 6600 थाळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. सदरील शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासोबतच केंद्रावरील स्वच्छतेबाबत नियमित तपासणी करण्यात यावी. यासाठी जिल्हा प्रशासनाने जेवणाचा दर्जा, स्वच्छता आणि तयार जेवणाची गुणवत्ता व चव तपासावी, जेणेकरून गरजू गरीब नागरिकांना योग्य दर्जाच्या जेवण थाळीचा लाभ मिळण्यासाठी मंत्री भुजबळ यांनी सुचित केले आहे.

इष्टांक वाढवून द्या

जिल्ह्यातील धान्य गोडाऊनमध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही बरोबरच माथाडी कामगारांना स्वच्छतागृह व चेंजिग रुम उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन लाभार्थींसाठी शिल्लक राहिलेल्या धान्यातून इष्टांक वाढवून देण्यात येत आहे, याची अंमलबजावणी करताना संबंधिताना धान्याचे वितरण करण्यात यावे, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी पुरवठा यंत्रणाला दिल्या. स्वस्त धान्य दुकान देत असताना लाभार्थी स्थानिक, दिव्यांग आणि महिला बचतगटांना रेशन दुकान देताना प्राधान्य देण्यात यावे.

ग्राहकांच्या तक्रारीची दखल

ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेऊन तातडीने दूर करण्यात यावी, यामधून अन्न नागरी पुरवठा विभागाचे कार्य जास्तीत जास्ती लोकाभिमुख असावे असेही यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यातील बायो डिझेल विकणाऱ्यांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, गॅस सिलेंडरचा वाहनांमध्ये वापर आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.याबरोबरच वैधमापन व नियंत्रण विभागाचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

संबंधित बातम्या

‘व्हॉट्सअ‍ॅप’चं नवीन फीचर खूपच भारी! इमेज पाठवताना आता युजर्स अनुभवणार नवा बदल

Neil Somaiya: सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार, नील सोमय्यांचं काय होणार?; उद्या कोर्टात सुनावणी

Sanjay Raut : केंद्राला लाज वाटत असेल तर सोमय्याची सुरक्षा काढा; संजय राऊत आक्रमक

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.