अवघा देश स्वतंत्र झाला, त्याच दिवशी या सन्याशाला अटक झाली, मराठवाड्याचे मुक्तीदाते स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृतीदिन!!

स्वातंत्र्यासाठीच्या अखंड लढ्यानंतर अखेर भारताचा स्वातंत्र्य दिन उगवणार होता. तेव्हा इकडे हैदराबादेत निजाम अस्वस्थ झाला. अखेर 15 ऑगस्टला भारताचा तिरंगा फडकला अन् स्वातंत्र्याची तयारी करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थांना निजामानं तुरुंगात डांबलं..पण हा योद्धा अखेर निजामाला पुरून उरला.

अवघा देश स्वतंत्र झाला, त्याच दिवशी या सन्याशाला अटक झाली, मराठवाड्याचे मुक्तीदाते स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृतीदिन!!
स्वामी रामानंद तीर्थ
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 7:00 AM

भारतभूमीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी असंख्य शीलेदारांनी लढा उभारला. या चळवळीचं यश म्हणूनच अवघ्या भारतासाठी आनंदाचा दिन उगवणार होता. भारताचा स्वातंत्र्य दिन येणार होता. पण इकडे हैदराबादेत निजाम मात्र अस्वस्थ झाला. अखेर 15 ऑगस्टला भारताचा तिरंगा फडकला अन् स्वातंत्र्याची तयारी करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थांना निजामानं तुरुंगात डांबलं.. देशातलं सर्वात मोठं हैदराबाद संस्थान ज्या निजामाच्या ताब्यात होतं तो सर्वात श्रीमंत राजा होता. पण हा योद्धा अखेर निजामाला पुरून उरला. त्याची कहाणी थोडक्यात…

हे स्वामी म्हणजेच व्यंकटेश भगवान खेडगीकर!

हैदराबाद स्वातंत्र्य लढातले थोर नेते आणि ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व असलेले स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर. कर्नाटकातील विजापूर जिह्ल्यातील सिंदगी येथील कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक. व्यंकटेश उर्फ रामानंद तीर्थ यांचे प्राथमिक शिक्षण मूळगावी झाले. पुढील शिक्षणासाठी सोलापूरला आले. लहानपणापासूनच आध्यात्मिक आणि देशभक्तीची ज्योत त्यांच्यात प्रज्वलित झालेली होती.

टिळकांचा प्रभाव, मातृभूमीचरणी समर्पणाची प्रतिज्ञा

पुढे पुण्यातील महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांसह बी.ए. व लोकशाहीचा विकास हा प्रबंध लिहून त्यांनी एमएची पदवी घेतली. पुण्यातील वास्तव्यात लोकमान्य टिळकांच्या भाषणांनी आणि कार्यानी त्यांना भारावून टाकलं होते. टिळकांचा मृत्यू झाला, तेव्हा आजन्म ब्रह्मचारी राहून उर्वरीत आयुष्य मातृभूमीच्या चरणी समर्पित करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली. त्यानंतर मुंबईतील कामगार नेते ना.म. जोशी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ते रुजू झाले. हा काळ होता 1926चा. यातूनच ते गिरणी कामगारांच्या लढ्याशी जोडले गेले. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी हे काम सोडले.

मूळ नावाचा त्याग, स्वामी रामानंद तीर्थ बनले

14 जानेवारी 1930 मध्ये ते हिप्परगा येथे मुक्कामी आले. येथेच जन्मनावाचा त्याग करून त्यांनी भिक्षुकी अंगीकारली. स्वामी नारायण यांच्याकडून संन्यासदीक्षा घेऊन ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयात त्यांनी काही काळ मुख्याध्यापक म्हणून काम केले. मात्र ब्रिटिशांच्या गुलागिरीविरोधात संपूर्ण देशात तेव्हा स्वातंत्र्याची चळवळ जोमात होती. मातृभूमीला पारतंत्र्याच्या जोखडातून सोडवण्यासाठी स्वामीजींनीही 1935 मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केला.

तत्कालीन हैदराबाद संस्थानाची स्थिती काय होती?

1935 च्या पुढील काळात आ.कृ. वाघमारे आणि अनंतराव कुलकर्णी यांनी हैदराबाद संस्थानच्या निजामशाही जुलूमाविरोधात शह देण्यासाठी हैदराबाद संस्थान महाराष्ट्र संघाची स्थापना केली. आंध्र आणि मराठवाड्याचा भागही हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. देशातलं हे सर्वात मोठं संस्थान होतं. त्यामुळे निजाम मीर अली हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस समजला जात होता. पण या श्रीमंत राजाची प्रजा जुलूमाखाली दबलेली होती. हैदराबाद संस्थान महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन परभणी जिल्ह्यातील परतूर इथं 1937 मध्ये पार पडलं. हैदराबादमधील जनता शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात स्वामीजींनी मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीवर घणाघाती टीका केली. याच भाषणानंतर हैदराबाद संस्थानातील असंतुष्टांचे नेतृत्व स्वामीजींवर सोपवण्यात आले. त्यानंतर असंख्य अनुयायांसह त्यांनी अंबाजोगाईतून हैदराबादला प्रयाण केले.

हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेतृत्व

हैदराबादेत गेल्यानंतर हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करण्यात आली आणि त्याचे नेतृत्व स्वामीजींकडे आले. त्यांच्या क्रांतिकारी विचारांसह गोविंदभाई श्रॉफ, आ.कृ. वाघमारे, बाबासाहेब परांजपे, शंकरराव चव्हाण, दिगंबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मदतीने स्वामीजींनी निजामाच्या जुलमी राजवटीविरोधातील आंदोलन अधिक तीव्र केले. मात्र संतापलेल्या निजामाने स्टेट काँग्रेसवर बंदी घालत स्वामीजींसह सर्व कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्याचे सत्र सुरु केले. पुढील दहा वर्षात या नेत्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. मात्र निजामाच्या कारावासात राहूनही स्वामी मराठवाड्यातील सशस्त्र लढ्याचे सूत्र हलवत होते.

देशाचा स्वातंत्र्य दिन आणि स्वामीजींना अटक

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. फाळणी झाली. भारतातील अनेक संस्थानं देशात विलीन झाली. पण निजामानं हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणार नाही, असा पवित्रा घेतला. तिरंगा फडकावण्यास त्यानं संस्थानात बंदी घातली. हैदराबाद संस्थानात देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या स्वामीजींना निजामानं तुरुंगात टाकलं. काही दिवस तुरुंगात काढले. नंतर भारत सरकारनं निजामासोबत जैसे थे करार केला. त्यानंतर स्वामीजींना सोडण्यात आलं. स्वामीजींनी या कराराचा निषेध केला. अजूनही 20,000 सत्याग्रही निजामाच्या तुरुंगात होते. स्वामीजींनी पुन्हा एकदा सीमावर्ती भागात दौरे सुरु केले. निजामानं पुन्हा 26 जानेवारी 1948 रोजी त्यांना अटक केली. रझाकाराच्या अत्याचारांना आता सीमाच उरली नव्हती. अखेर भारताचे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात ऑपरेशन पोलो राबवण्यात आलं आणि हैदराबाद संस्थानातील निजाम राजवट संपुष्टात आली. हा दिवस होता 17 सप्टेंबर 1948. याच दिवशी स्वामीजींची सुटका झाली. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे खरे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते म्हणून संपूर्ण देशात ते प्रसिद्ध झाले.

औरंगाबादचे खासदारही झाले

मराठवाडा मुक्त झाल्यानंतरही स्वामीजींनी समाजातील तेढ वाढू नये, सलोखा रहावा, यासाठी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. स्वतंत्र भारतात त्यांनी दोन वेळा निवडणूक लढवली. गुलबर्गा आणि औरंगाबादमधून ते लोकसभेवर निवडून आले. दुसरी टर्म झाल्यावर मात्र त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. पुढे ते आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही सहभागी झाले. त्यानंतर वय वाढू लागल्याने 1971 मध्ये ते आजारी पडले. हैदराबादमध्ये उपचार सुरु असतानाच त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली आणि 22 जानेवारी 1972 रोजी त्यांचं निधन झालं.

इतर बातम्या- 

नाशिक जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून पुन्हा उघडणार; कोरोना नियमांचे काटेकोर पालन

नव्या महिला सक्षमीकरण धोरणाच्या निर्मितीमध्ये सर्वांच्या सूचनांचा विचार, नवे धोरण काय? वाचा सविस्तर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.