देशातील सर्वात मोठे शिवलिंगाच्या आकाराचे मंदिर, औरंगाबादच्या वेरूळमध्ये साकारतेय 12 ज्योतिर्लिंगाचे देवस्थान
पावसाळ्यात भव्य शिवलिंगावर निसर्गदेवताच जणू पाण्याचा अभिषेक करेल आणि पिंडीवर पडणारे पाणी शाळुंकेतून खाली पडतानाचे दृश्य बघणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फेडणार ठरेल.
औरंगाबाद। पर्यटनासाठी औरंगाबादमध्ये (Aurangabad Tourism) येणाऱ्या उत्साही पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांचे लक्ष वेधून घेणारे आणखी एक मंदिर वेरूळमध्ये (Ellora, Aurangabad) साकारत आहे. वेरूळ येथे देशातील सर्वात जास्त उंचीचे शिवलिंगाच्या आकारचे मंदिर बांधले जात आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी देशातील 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींची प्रतिष्ठापना होणार आहे. उज्जैन येथे या प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरु आहे. एकाच वेळी 12 पिंडींना प्रदक्षिणा घालण्यासाठी विशेष मार्गही तायर करण्यात येणार आहे.
28 वर्षांपासून प्रकल्पाचे काम सुरु
वेरूळ येथील श्री विश्वकर्मा तीर्थधाम परिसरात तब्बल 28 वर्षांपासून हे काम सुरु आहे. 1995 साली मंदिराच्या कामाला सुरुवात झाली. आधी हे मंदिर 108 फूटांच्या शिवलिंगाच्या आकारात बांधण्याची योजना होती. मात्र त्यानुसार पुरेसा निधी मिळू शकला नाही. त्यामुळे 1999 मध्ये निधीअभावी मंदिराचे काम बंद पडले. गेल्या वर्षी पुन्हा मंदिराच्या कामाला वेग मिळाला. आता मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून 2022 या वर्षातील शिवरात्रीपर्यंत ते पूर्ण करण्याची योजना आहे.
मंदिरापर्यंत कसे जायचे?
औरंगाबाद रेल्वेस्टेशनसाठी देशातल्या प्रत्येक मुख्य शहरपापासून रेल्वेसेवा उपलब्ध आहे. तुमच्या शहरातून औरंगाबादला थेट ट्रेन नसेल तर तुम्ही मनमाड रेल्वे जंक्शनवर जाऊन तेथून औरंगाबादला येऊ शकता. औरंगाबाद जिल्ह्यात आल्यावर वेरूळकडून कन्नडकडे जाणाऱ्या मार्गावर श्री विश्वकर्मा मंदिर आहे. मंदिराची भव्य शिवलिंगाच्या आकाराची इमारत आणि त्याची ख्याती दूरवर पसरलेली असल्याने कोणीही तिथपर्यंत जाण्याचा मार्ग सांगू शकेल, किंवा मार्गावरूनच ते मंदिर दिसू शकेल. आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असून, भाविकांसाठी या निमित्ताने दिव्य मराठी वृत्तपत्रात या मंदिराचा फोटो प्रकाशित करण्यात आला आहे.
पिंडीवरील अभिषेकाचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडेल
या मंदिराचे बांधकाम महेंद्र बापू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. महेंद्र बापू हे मूळ गुजरातमधील बडोद्याची चांदोन येथील रहिवासी आहे. त्यांच्या कल्पनेतूनच हे मंदिराचे बांधकाम सुरु आहे. विशेष म्हणजे मंदिंराचे बांधकाम पूर्ण झाल्यावरचे दृश्य खूप नयनरम्य असेल. मंदिर पूर्णपणे काळ्या रंगाचे असेल. पावसाळ्यात भव्य शिवलिंगावर निसर्गदेवताच जणू पाण्याचा अभिषेक करेल आणि पिंडीवर पडणारे पाणी शाळुंकेतून खाली पडतानाचे दृश्य बघणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फेडणार ठरेल. मंदिराची एकूण उंची 60 फुटांची तर त्यातील पिंडाची उंची 40 फुटांची आहे. शाळुंका 38 फुटांची असेल. तसेच एकूण मंदिराचा परिसर 108 बाय 108 चौरस फूट असेल.
घृष्णेश्वराचे मंदिर कोणी बांधले होते?
औरंगाबादमधीलच प्रसिद्ध ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वराचे मंदिर. पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तुकलेचा हा उत्तम नमून आहे. मंदिराचं बांधकाम लाल रंगाच्या दगडाने केलं आहे. मंदिराच्या परिसरातील लाल दगडांच्या भिंतींवर भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या दहा अवतारांचे प्रतिबिंध दर्शवलेले आहे. गर्भगृहाच्या पूर्वेकडे शिवलिंग आहे. तिथेच नंदीस्वरची मूर्तीदेखील आहे. मंदिराचे निर्माण देवी अहिल्याबाई होळकर यांनी केलं होतं. (Tallest Shivling Shaped Temple in Ellora, Aurangabad, Maharashtra, India)
इतर बातम्या-
औरंगाबाद जिल्हा बँकेत नोकरीची संधी; 200 पदांसाठी भरती
औरंगाबादच्या ‘बर्थ डे’ ची सगळीकडे चर्चा, झाडांच्या पहिल्या वाढदिवसाला सेंद्रीय खतांचा यम्मी केक