AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद अन् जालना दोन्ही ठिकाणी पीटलाइन, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या आश्वासनानंतर वाद शमणार की चिघळणार?

औरंगाबादमधील चिकलठाण्यात रेल्वेची पीटलाइन होणार असेल तर त्यापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या जालन्याला पीटलाइन कशी मिळू शकते, हे कसे व्यवहार्य ठरू शकते, असा सवाल रेल्वे संघटनांनी केला आहे.

औरंगाबाद अन् जालना दोन्ही ठिकाणी पीटलाइन, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या आश्वासनानंतर वाद शमणार की चिघळणार?
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 3:00 AM

औरंगाबादः औरंगाबामधील चिकलठाणा येथे होऊ घातलेली रेल्वेची पीटलाइन (Railway pitline) जालन्याला पळवल्याचा आरोप केद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर केला जात होता. डॉ. भागवत कराड यांनी यापूर्वी रेल्वेची पीटलाइन औरंगाबादेत होत असून त्यासाठी चिकलठाणा येथील जागा प्रस्तावित असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर मंत्री दानवे यांच्या जालन्याच्या घोषणेनंतर या दोन जिल्ह्यांमध्ये वाद सुरु झाला होता. अखेर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini Vaishnav) यांनी दोन्ही जिल्ह्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून दोन्ही ठिकाणी रेल्वेची पीटलाइन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती दिली. बुधवारी औरंगाबादमधील उद्योजकांच्या शिष्टमंडळाला ही माहिती देण्यात आली. मात्र यानंतरही वाद न मिटता आणखी चिघळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिकलठाणा येथे पीटलाइन मंजुर असताना 65 किलोमीटर अंतरावरील जालन्यालाही पीटलाइन कशी मिळू शकते, असा सवाल प्रवासी आणि रेल्वे संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री काय म्हणाले?

उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, विवेक देशपांडे, डॉ. फडके आणि भाजपच्या विजया रहाटकर यांनी बुधवारी दिल्लीत अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी पीटलाइनसह औरंगाबाद- नगर रेल्वे मार्ग, जालना-जळगाव रेल्वे मार्ग, औरंगाबाद-चाळीसगाव मार्ग आदींवर चर्चा झाली. यावेळी रेल्वेची पीटलाइन जालना आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितले.

रेल्वे पीटलाइनचा नेमका वाद काय?

रेल्वेची पीटलाइन म्हणजे एखाद्या रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे स्वच्छता आणि दुरुस्ती करण्यासाठीचे अधिकचे रुळ. ज्या ठिकाणी पीटलाइन होते, त्याठिकाणी रेल्वे गाड्या जास्त वेळ थांबतात. तसेच अतिरिक्त रेल्वे गाड्या येथून सोडल्या जाऊ शकतात. त्यामुळे पीटलाइन झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या विकासाच निश्चित भर पडते. त्यानुसार औरंगाबादला गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या पीटलाइनची प्रतीक्षा आहे. चिकलठाणा येथे यासाठी जागा प्रस्तावितदेखील करण्यात आली होती. मात्र 2 जानेवारी रोजी जालना रेल्वे स्टेशनवर 100 कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाइन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. त्यानंतर औरंगाबादसाठी पीटलाइन करण्याची मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लावून धरली. या वादावर पडदा पाडण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दोन्ही ठिकाणी पीटलाइन होईल, असे आश्वासन दिले आहे.

रेल्वे संघटनांचा काय सवाल?

दरम्यान, औरंगाबादमधील मुकुंदवाडी स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबवण्यात याव्यात या मागणीसाठी अनेक दिवसांपासून रेल्वे संघटना प्रयत्न करत आहेत. मात्र हे करणे व्यवहार्य नसल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता औरंगाबादमधील चिकलठाण्यात रेल्वेची पीटलाइन होणार असेल तर त्यापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या जालन्याला पीटलाइन कशी मिळू शकते, हे कसे व्यवहार्य ठरू शकते, असा सवाल रेल्वे संघटनांनी केला आहे. तसेच औरंगाबादच्याच पीटलाइनला प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशी मागणी रेल्वे संघटनांनी केली आहे.

इतर बातम्या-

Malegaon Hijab Day : कर्नाटकच्या घटनेचे मालेगावात पडसाद, जमेत ए उलमातर्फे ‘हिजाब दिवस’ चे आयोजन

VIDEO: राजभवनात थुई थुई नाचणारे मोर आणि विषारी नागही येतात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.