गंभीर! कोरोनाची लस न घेतलेल्या तिघांचा औरंगाबादेत मृत्यू, घाटी रुग्णालयात सुरु होते उपचार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांना सौम्य स्वरुपाची लक्षणे जाणवत असली तरीही लस न घेणे रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात अशा तिन्ही रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला.

गंभीर! कोरोनाची लस न घेतलेल्या तिघांचा औरंगाबादेत मृत्यू, घाटी रुग्णालयात सुरु होते उपचार
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 12:19 PM

औरंगाबादः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रथमच शहरात तिघांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांवर विषाणूचा प्रभाव कमी गंभीर स्वरुपाचा दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण लसीकरण आहे. मात्र ज्या व्यक्तींनी लस घेतलेली नाही, त्यांना विषाणूसंसर्गाच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. औरंगाबादमध्ये 13 जानेवारी रोजी अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 5 जानेवारी रोजी दोघांचे कोरोनामुळे प्राण गेले होते. गुरुवारी मरण पावलेले तिन्ही रुग्ण कोमॉर्बिड म्हणजेच विविध व्याधीग्रस्त होते.

घाटीत व्हेंटिलेटरवर सुरु होते उपचार

घाटी रुग्णालयात सदर तिन्ही रुग्णांवर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यापैकी एका 65 वर्षांच्या महिलेवर 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. ती गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील रहिवासी होती. 20 डिसेंबर 2021 रोजी तिला घाटीच्या सुपस्पेशालिटी वॉर्डात दाखल करण्यात आले होते. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास, मधुमेह, न्यूमोनिया असल्यामुळे श्वसनाचा त्रास होता. चिकलठाणा येथे आणखी एका 78 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांनाही हृदयविकार आणि मधुमेहाचा त्रास होता. तिसरा रुग्ण नायगाव येथील रहिवासी होते, त्यांचे वय 51 वर्षे होते. त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याने डायलिसिस सुरु होते. तेदेखील गंभीर अवस्थेतच घाटी रुग्णालयात दाखल झाले होते.

लस न घेतल्यास जीवावर बेतू शकते!

सुपर स्पेशालिटीचे विशेष कार्याधिकारी डॉ. सुधीर चौधरी म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रथमच एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिन्ही रुग्णांनी लस घेतलेली नव्हती. तिसऱ्या लाटेत रुग्णांना कमी त्रास होत असला तरी ओमिक्रॉन विषाणूला कमी लेखणे जीवावर बेतू शकते. लस घेतलेली असेल तरच विषाणूची लक्षणे सौम्य दिसून येतात, हे नागरिकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच मास्क वापरणे, गर्दी टाळणे आदी नियमांचे पालन करणेही अत्यावश्यक आहे.

इतर बातम्या-

Kiran Mane | कोणतंही सरकार आलं तरी विरोधात पोस्ट लिहिणारच, तो माझा हक्कच; अभिनेता किरण माने भूमिकेवर ठाम

Nanded | नांदेड जिल्हयात गारपिटीसह जोरदार पाऊस, शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.