AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

jalna lathi charge | मराठा आंदोलकांवर बेछूट लाठीमार, दोन्ही राजे आक्रमक; संभाजीराजे आणि उदयनराजे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

जालन्यात मराठा आंदोलकांवर काल पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. अनेक जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या घटनेवरून माजी खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

jalna lathi charge | मराठा आंदोलकांवर बेछूट लाठीमार, दोन्ही राजे आक्रमक; संभाजीराजे आणि उदयनराजे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
sambhaji rajeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 9:03 AM

जालना | 2 सप्टेंबर 2023 : जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर बेछुट गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलक भयभीत झाले आहेत. या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमारामुळे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात तर या घटनेचा निषेध म्हणून बंदची हाकही देण्यात आली आहे. तर, विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेमुळे माजी खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले हे दोन्ही राजे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या दोन्ही राजेंनी जालन्यातील घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला आहे.

जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आल्याच्या वृत्तामुळे दोन्ही राजे व्यथित झाले आहेत. खासदार उदयनराजे भोसले पुण्यात आहेत. ते पुण्याहून जालन्याकडे जायला निघाले आहेत. जालन्यात ते आंदोलकांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं जाणून घेणार आहेत. तर संभाजीराजेही जालन्यात जाणार असून आंदोलकांची विचारपूस करणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सुद्धा जालन्यात जात आहेत. ते दुपारी मीडियाशी संवाद साधणार आहेत.

हे सुद्धा वाचा

संभाजी राजे काय म्हणाले?

अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संवैधानिक मार्गाने आंदोलनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला. शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांना पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.

मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री आणि सरकार जबाबदार असेल, असा इशाराही संभाजीराजे यांनी ट्विट करून दिला आहे.

चौकशी करा, उदयनराजे आक्रमक

या लाठीचार्जवरून खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा आक्रमक झाले आहेत. जालना येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज केला. हे कृत्य अतिशय निंदनीय आहे. आम्ही याचा निषेध करतो. शासनाने लक्ष घालून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी ट्विटद्वारे केली आहे.

फडणवीस राजीनामा द्या

संभाजी ब्रिगेडनेही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मराठ्यांच्या जीवावर जगता आणि मराठ्यांवरच लाठीचार्ज करता याचा अर्थ हे सरकार आरक्षण विरोधी आहे. आरएसएसच्या लोकांना आरक्षण नको आहे म्हणूनच जाणीवपूर्वक हा आरक्षणाचा खेळ सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे. तुमच्याकडून आणि तुमच्या सरकारकडून आणि आपल्या सरकारकडून ही अपेक्षा नव्हती. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.