AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 ऑक्टोबर: उद्या UPSC पूर्वपरीक्षेसाठी औरंगाबादेत 47 केंद्रांवर तयारी, 14,504 उमेदवार देणार परीक्षा, वाचा नियम….

 परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, मुळ ओळखपत्र, सॅनिटायझर बॉटल, पारदर्शक पाणी बॉटल एवढेच साहित्य आणण्याची परवानगी आहे. याव्यतिरिक्त कोणतेही साहित्य उमेदवाराला जवळ बाळगू दिले जाणार नाही.

10 ऑक्टोबर: उद्या UPSC पूर्वपरीक्षेसाठी औरंगाबादेत 47 केंद्रांवर तयारी, 14,504 उमेदवार देणार परीक्षा, वाचा नियम....
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 4:33 PM

औरंगाबाद: केंद्रीय लोकसेवा आयोगन (Union Public Service Commission), नवी दिल्ली अर्थात युपीएससी मार्फत उद्या 10 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये विविध केंद्रांवर (Aurangabad center) परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी औरंगाबाद शहरात 47 उपकेंद्र निश्चित करण्यात आले आहे. युपीएससीच्या (UPSC Exam) पूर्वपरीक्षेसाठी उद्या औरंगाबादेतील केंद्रांवर 14504 उमेदवार परीक्षा देतील, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ तथा परीक्षा समन्वयक निलेश गटने  (NIlesh Gatane)यांनी दिली.

परीक्षेसाठी केंद्रांवर तयारी पूर्ण

युपीएससीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 47 केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल. सदर परीक्षेसाठी एकूण 1989 अधिकारी तथा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता उपस्थित राहतील.

दोन सत्रांत होणार परीक्षा

युपीएससीची ही परीक्षा औरंगाबादेत दोन सत्रात होणार आहे. सकाळी 9.30 ते 11.30 वाजता पहिले सत्र पार पडेल. तर दुपारी 14.30 ते 16.30 या कालावधीत दुसऱ्या सत्रातील परीक्षा पर पडेल. जिल्ह्यातील 47 उपकेंद्रांवर ही परीक्षा घेतली जाईल.

एक तास आधी उपस्थित राहण्याचे आवाहन

युपीएससीच्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या एक तास आधी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रासाठी 8.30 ते 9.20 या वेळेत प्रवेश दिला जाईल तसेच दुपारच्या सत्रात दुपारी 13.30 ते 14.20 या वेळेदरम्यानच परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश दिला जाणार आहे.

वाचा.. प्रवेशासाठी आणखी कोणते नियम?

  1.  परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, मुळ ओळखपत्र, सॅनिटायझर बॉटल, पारदर्शक पाणी बॉटल एवढेच साहित्य आणण्याची परवानगी आहे. याव्यतिरिक्त कोणतेही साहित्य उमेदवाराला जवळ बाळगू दिले जाणार नाही.
  2.  उमेदवाराला त्यांच्यासोबत डिजिटल डायरी, मायक्रोफोन, ब्लूटूथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षेच्या कक्षात घेऊन जाण्यास मनाई आहे.
  3. उपरोक्त इलेक्ट्रॉनिक साहित्य आणल्यास उमेदवारांना स्वतःच्या जबाबदारीवर परीक्षा केंद्रांच्या आवारात मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. साहित्याची जबाबदारी आयोग घेणार नाही.
  4. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाज्याच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारावर फौजदारी व प्रशासकीय कारवाई केली जाईल. तसेच त्यांना आगामी परीक्षांकरिता बंदी घालण्यात येईल.
  5. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली येथून आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.इतर बातम्या-

    MPSC Exam: मोठी बातमी, राज्य सेवा परीक्षेच्या 100 जागा वाढवल्या, एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर

    MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा परीक्षा 2021ची जाहिरात प्रसिद्ध, 2 जानेवारीला पूर्व परीक्षा

..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.