Aurangabad Weather: शहरात आज वातावरण ढगाळ, कुठे ऊन-कुठे सावली, पुढच्या आठवड्यातही मुसळधार पावसाची शक्यता नाही

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगडकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोरही कमी झालेला दिसून येईल.

Aurangabad Weather: शहरात आज वातावरण ढगाळ, कुठे ऊन-कुठे सावली, पुढच्या आठवड्यातही मुसळधार पावसाची शक्यता नाही
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 5:34 PM

औरंगाबाद: मंगळवारी ढगफुटीचा हाहाकार झेललेल्या औरंगाबादकरांना (Heavy Rainfall in Aurangabad) काहीसा दिलासा मिळणारी बातमी आहे. शहर आणि परिसरातला पावसाचा जोर कमी झाला असून पुढील आठवड्यातही मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता नाही. आज गुरुवारी शहराचे हवामान ढगाळ होते. तर कुठे ऊन आणि सावलीचा खेळ सुरु होता. पण एकूणच वातावरण मोकळे असल्याने सण-उत्सवाकरिता खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडता आले. शहर आणि परिसरात आज काही ठिकाणी हलक्या स्वरुपात पावसाचे थेंब आले. पण कुठेही पावसाचा जोर दिसून आला नाही.

पुढच्या आठवड्यात मोठा पाऊस नाही

हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगडकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोरही कमी झालेला दिसून येईल. आज दिनांक 9 सप्टेंबरपासून ते पुढील आठवड्यापर्यंत म्हणजेच 17 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातच मोठा पाऊस होण्याची शक्यता फार कमी आहे. अर्थात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तसेच 16 आणि 17 सप्टेंबर या दोन दिवसात पूर्व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. यात हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांचा समावेश असेल.

ढगफुटीने औरंगाबादचं अवसान गळालं

ऐन गणपती-गणेशोत्सव तोंडावर आला असताना औरंगाबादमध्ये मंगळवारी झालेल्या पावसाने मोठा हाहाकार माजवला. ठिकठिकाणी नालेसफाई, रस्ता दुरुस्तीची खोळंबलेली, अर्धवट राहिलेल्या कामांमुळे शेकडो घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरले. महापालिकेने दुसऱ्या दिवशी काही ठिकाणची पाहणी करून तिथे तात्पुरती मलपमट्टी केली असली तरीही या आसमानी संकटातून कसे सावरायचे हाच प्रश्न नागरिकांना सतावत आहे. ग्रामीण भागात तर घर-संसारासह अवघी शेतंही वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

शहरात मंगळवारचा पाऊस ढगफुटीपेक्षाही भयंकर

मंगळवारी शहरात ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. सुरुवातीच्या तीस मिनिटात म्हणजे 7:40 मिनिटापर्यंत पाऊस पडण्याचा सरासरी वेग हा 166:75 मिमी असा नोंदवला गेला. या तीस मिनिटांच्या कालावधीत 56:2 मिमी पावसाची नोंद झाली. सामान्यपणे ढगफुटीदरम्यान ताशी 100 मिमी वेगाने पाऊस झाल्यास त्याला ढगफुटी म्हटली जाते. मात्र कालचा पाऊस त्यापेक्षा जास्त वेगाने होता. रात्री 7.40 नंतर पावसाचा वेग थोडा कमी होत गेला. 07:50 पर्यंत सरासरी 86:9 मी मी वेग होता व नंतर 08:10 वाजेपर्यंत तो कमी होत 53:24 मीमी प्रति तास पावसाचा वेग राहिला. तर सायंकाळी 07:10 ते 08:10 या एका तासात 87.6 मी. मी. औरंगाबाद शहरात पावसाची नोंद झाली. (Weather forecast, rain update in Aurangabad Marathwada region, Maharashtra)

इतर बातम्या-

Marathwada Weather Update: मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार, ऑरेंज ॲलर्ट जारी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Aurangabad Weather Update: मराठवाड्यात बीड-जालन्याला पावसाने चांगलेच झोडपले, पुढचे दोन दिवसही दमदार बरसणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.