गद्दार म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे; संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांची नेमकी प्रतिक्रिया काय?
आता गद्दारी केल्यानंतर यांना अशी बुद्धी सुचली आहे. हे आदित्य ठाकरे यांच्या मागे चारदा फिरत होते. त्यामुळं गद्दारीशिवाय याला दुसरा कोणताही शब्द नसल्याचंही ते म्हणाले.
औरंगाबाद : बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यावरून काही घडामोडी घडल्या. गद्दारांना तैलचित्र लावण्याचा अधिकार नसल्याचं ठाकरे गटाच्या वतीनं सांगण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांनाही वाईट वाटत असले, असंही ठाकरे गटाच्या वतीनं सांगण्यात आलं. त्यावर शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणाले, असं जे कोणी बोलतात. त्यांच थोबाड फोडलं पाहिजे. यावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, दम असेल, तर फोडून दाखवावं. मी म्हणतो आता गद्दार. गद्दारांना अधिकार नाही. दम असेल तर फोडून दाखवा, असं आव्हान अंबादास दानवे यांनी दिलं.
आदित्य ठाकरे यांना काय कळतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या मांडीवर बसले म्हणून त्यांना महत्त्व आहे. नाहीतर त्यांना कुत्रही विचारलं नसतं. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, मग, संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्या चार-चार सभा कशाला घेतल्या. त्यांच्या हस्ते चार-चार उद्घाटनं कशाला केले. त्यांना समजत नसेल, तर आदित्य ठाकरे यांची सभा मतदारसंघात व्हावी, म्हणून का प्रयत्न करत होते, असा सवालही अंबादास दानवे यांनी विचारला.
गद्दारीशिवाय दुसरा शब्द नाही
आता गद्दारी केल्यानंतर यांना अशी बुद्धी सुचली आहे. हे आदित्य ठाकरे यांच्या मागे चारदा फिरत होते. त्यामुळं गद्दारीशिवाय याला दुसरा कोणताही शब्द नसल्याचंही ते म्हणाले.
३० जानेवारीला निवडणूक आयोगाची सुनावणी आहे.त्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाला याबद्दल निर्णय येण्याची शक्यता आहे. ठाकरे गटानं तारीख वाढवून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय.
१६ आमदारांची अपात्रता होणार?
यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, मग आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत असं म्हणायचं का की, १६ आमदारांची अपात्रता होणार आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालय तारीख वाढवून देत आहे. पण, असं आम्ही म्हणणार नसल्याचंही अंबादास दानवे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, दिल्लीच्या आदेशाशिवाय हे काही करू शकत नाही. हे सांगतात आम्ही शिवसेनेचे आहोत. पण, यांचे नेते, नेतृत्व दिल्लीत आहेत. त्यांच्या आदेशाशिवाय हे पानही हालवू शकत नाही.