माझ्या मृत्यूसाठी मनोज पवार जबाबदार… औरंगाबादेत व्हिडिओ व्हायरल करत कामगाराची आत्महत्या, मनोजच्या अटकेसाठी नातेवाईक आक्रमक

शिवनाथच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या व्यवस्थापकाला आधी अटक करा, अशी मागणी करत संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको केला.

माझ्या मृत्यूसाठी मनोज पवार जबाबदार... औरंगाबादेत व्हिडिओ व्हायरल करत कामगाराची आत्महत्या, मनोजच्या अटकेसाठी नातेवाईक आक्रमक
फुलंब्रीत व्हिडिओ व्हायरल करत कामगाराची आत्महत्या
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 1:10 PM

औरंगाबाद: फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा येथील 29 वर्षीय तरुण कामगाराने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली.शिवनाथ कोलते (Shivnath Sakharam Kolte) असे या तरुणाचे नाव आहे.  शनिवारी सकाळी नऊ वाजता या तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला. यात तो ज्या कंपनीत काम करत होता, त्या कंपनीच्या व्यवस्थापकाला मृत्यूसाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

आत्महत्येपूर्वी तयार केला व्हिडिओ

फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा येथील शिवनाथ सखाराम कोलते (29 वर्षे), रा. कविटखेडा, ह.मु. औरंगाबाद या तरुणाने शनिवारी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. कविटखेडा येथील शिवनाथ कोलते हा वाळून एमआयडीसी येथील नील ऑटो कंपनीत मागील पाच वर्षांपासून कामाला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी तो कविटखेडा येथे आपल्या गावी आला होता. शनिवारी आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला. त्यात तो म्हणाला, ‘सॉरी माझ्या मृत्यूस कंपनी व्यवस्थापक मनोज पवार हा कारणीभूत आहे. ‘ या व्हिडिओसोबत तरुणाने सुसाइड नोटही लिहिली. सदर घटनेची माहिती वडोद बाजार पोलिसांना मिळताच पोलिसांनी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात शिवनाथला दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वडोद बाजार पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि विच्छेदनासाठी डॉक्टरांच्या स्वाधीन केला.

मनोजच्या अटकेसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

शिवनाथने केलेल्या व्हिडिओतून त्याच्या मृत्यूसाठी कंपनी व्यवस्थापक मनोज पवार जबाबदार आहे, त्यावर गुन्हा दाखल दाखल करून अटक करत नाही, तोपर्यंत शवविस्छेदन करायचे नाही, अशी अट नातेवाईकांनी घातली. पोलिसांनी शवविच्छेदनाचा निर्णय घेतल्याने असे का केले, असे म्हणत शिवनाथच्या संतप्त नातेवाईकांनी औरंगाबाद-जळगाव महामार्गावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयासमोर दुचाकी आडव्या लावून रास्ता-रोको आंदोलन केले. घटनेची माहिती फुलंब्री पोलीस निरीक्षक अशोक मुदग्गीराज यांना मिळताच ते फौजफाट्यासह आंदोलनस्थळी हजर झाले. नातेवाईकांची समजूत घालून कंपनी व्यवस्थापकाला पोलीस लवकरच ताब्यात घेतील, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी रास्ता रोको मागे घेतला. दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी मनोज पवारविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शरद पवार हे करीत आहेत. दरम्यान, रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

इतर बातम्या-

मोदीजी, अरिजीतच्या आवाजातील गाण्याची निर्मिती, हीच अखेरची इच्छा, 16 वर्षीय तरुणाची सुसाईड नोट

व्हॉटसअॅपवर आत्महत्येचे स्टेटस ठेवून नाशिकमध्ये अल्पवयीन प्रेमीयुगुलाने जीव देण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.