Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथे वाघ दत्तक घेणे आहे! औरंगाबाद महापालिकेची योजना, एक वर्षाच्या देखभालीचा खर्च पालकांनी घ्यावा!

औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातील प्राणी दत्तक देण्याची योजना महापालिकेने आखली आहे. वर्षभरासाठी प्राण्यांची देखभाल करण्याचा खर्च पालकांनी उचलावा, याद्वारे प्राण्यांना अधिक चांगल्या सोयी पुरवाव्यात असा या मागील हेतू आहे.

इथे वाघ दत्तक घेणे आहे! औरंगाबाद महापालिकेची योजना, एक वर्षाच्या देखभालीचा खर्च पालकांनी घ्यावा!
औरंगाबाद महापालिकेने प्राणी संग्रहालयातील प्राणी दत्तक देण्याची योजना आखली आहे.
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 8:00 AM

औरंगाबादः महापालिकेच्या (Aurangabad municipal corporation) सिद्धार्थ उद्यानातील (Siddharth Garden) प्राणी संग्रहालयातील वाघ दत्तक देण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वाघासह प्राणी संग्रहलयातील (Zoo) इतर प्राणी दत्तक दिले जाणार आहे. म्हणजेच ज्या पालाकंनी हे प्राणी दत्तक घेतले आहेत, त्यांनी प्राण्यांच्या वर्षभरासाठीच्या देखभालीचा संपूर्ण खर्च करायचा आहे. या योजनेत वाघ, बिबट्या, कोल्हे, माकड, कासव आदी प्राणी दत्तक दिले जातील.

प्राणिसंग्रहालयात 14 वाघ

मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय म्हणून औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानाची ख्याती आहे. पर्यटन नगरी असलेल्या औरंगाबादमध्ये देश-विदेशातील लोक येत असतात. त्यांच्यासाठीदेखील औरंगाबादचे प्राणीसंग्रहालय हे उत्तम पर्यटन स्थळ आहे. त्यामुळेच दररोज शेकडो पर्यटक या प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. इथे 14 वाघ असून बिबटे, कोल्हे, नीलगाय, सांबर, चितळ, माकड, कासव आदी 310 प्राणी आहेत. आता मनपाने या प्राण्यांसाठी दत्तक योजना आखली आहे.

मनपाची प्राणी दत्तक योजना

मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय आणि उपायुक्त सौरभ जोशी यांनी प्राणी संग्रहालयातील प्राणी हे शहरातील इच्छुक प्राणी, मित्र, व्यक्ती, संस्था व कंपन्यांना दत्तक दिले जाणार आहेत. प्राणी दत्तक योजनेची मार्गदर्शक तत्वे ठरवण्यात आली आहेत. प्राणी दत्तक योजनेत सहभागी होणाऱ्यांना प्राण्यांचा वर्षभराचा खर्च द्यावा लागणार आहे. प्राणी दत्तक देऊन निधी उभारणे आणि त्याद्वारे प्राण्यांना अधिक चांगल्या सोयी सुविधा पुरवणे, हा यामागील हेतू आहे.

इतर बातम्या-

VIDEO: अँटेलिया प्रकरणात फेक पासपोर्ट बनवला, एन्काऊंटरही करणार होते, वाझे-परमबीर सिंगाचा खतरनाक प्लान; मलिकांची धक्कादायक माहिती

Aurangabad: कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेविकेचा हृदयविकाराने मृत्यू, वैजापुरात हळहळ!

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.