AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगजेबावरुन राज ठाकरे यांचे राजकारण्यांना फटकारे, काय म्हणाले पाहा ?

राज ठाकरे यांची तोफ गुढीपाडव्या निमित्त शिवाजी पार्कवर धडाडली. ज्यांची मते दिसली त्यांचे आभार मानले, ईव्हीएममध्ये मते टाकूनही ज्यांची मते दिसली नाहीत त्यांचेही आभार मानतो असे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितले.

औरंगजेबावरुन राज ठाकरे यांचे राजकारण्यांना फटकारे, काय म्हणाले पाहा ?
raj thackeray speech
| Updated on: Mar 30, 2025 | 10:47 PM
Share

राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील भाषणात राजकारण्यांना जोरदार फटकारे मारले. छत्रपती शिवाजी महाराज वारल्यानंतरही औरंगजेब महाराष्ट्रात का थांबला होता?  कारण त्याला येथील विचार मारायचा होता. आम्हाला मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेबाला येथे मारला होता हे लोकांना दिसायला हवे. येथील औरंगजेबाची कबर आहे तिचे डिझाईन काढून टाका ती कबर उघडी ठेवा ती लोकांनी पाहायला हवी, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी म्हणाले. एवढ्या साम्राज्याचा बादशाहा केवळ अडीच तीन जिल्ह्याच्या राजाला संपवायला कसा आला याचा विचार करा असेही आवाहन राज ठाकरे यांनी केले.

जातीत भांडणे लावणाऱ्यांच्या नादी लागू नका

राज ठाकरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर. या हिंद प्रांताची काय अवस्था होती. सर्व जातीचे लोक कुणा ना कुणाकडे होते ना कामाला. शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाहीतच होते ना ? त्यानंतर ते निजामशाहीत गेले ना. तो काळ वेगळा होता. परिस्थिती वेगळी होती. त्यांनी का असा निर्णय होते. जे कोणी राज्यातील संरजामदार होते त्यांच्या विरोधात महाराजांचा लढा होता. ते कोण होते. त्यांना जातीत का पाहता?  अफजल खानाचा वकील कुलकर्णी होता. ब्राह्मण होता. अफजल खानाशी बोलणी करणारा शिवाजी महाराजांचा वकीलही ब्राह्मणच होता. तेव्हा वेगवेगळी माणसं एकमेकांकडे कामावर होती. इतिहासातील प्रत्येक गोष्ट कागदावर नाही. त्यावेळी काय निर्णय घेतले, काय परिस्थिती होती आपल्याला काय माहिती ? त्यामुळे तुम्ही जातीत भांडणे लावणाऱ्यांच्या नादी लागू नका असे आवाहन केले.

३०० ते ४०० वर्षापूर्वीचा इतिहास त्यावर आपण आज भांडतोय

३०० ते ४०० वर्षापूर्वीचा इतिहास त्यावर आपण आज भांडतोय जातीपातीत. आग्र्याच्या दरबारात महाराजांच्यासमोर संभाजी महाराज असताना. संभाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच हजाराची मनसबदारी स्वीकारली आहे. शिवाजी महाराजांसमोर. महाराजांचा होकार असल्याशिवया होईल? पण दरबारात अडकलो. स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. आता स्वीकारू नंतर पाहू. राजकारण असतं ते. परिस्थिती काय आहे. कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण पाहणार की नाही. शिवाजी महाराजांकडे औरंगजेबाचा माणूस मिर्झा राजे जयसिंग आला ते हिंदू होता. तानाजी मालूमालुसरे यांचा लढाईत मृत्यू झाला. तो उदयभानासोबतच्या लढाईत ना ?  तो राजपूत होता. हिंदू होता ना. आपण कोणत्या काळात जगतो. शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ वेगळा होता. नंतरचा काळ होता असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.