Ayodhya Verdict Result: अयोध्याचा निकाल देण्यापूर्वी देवा पुढे बसलो अन्… सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितला तो किस्सा

Dhananjaya Yeshwant Chandrachud in pune: मी परंपरेमुळे नियमित पूजा करतो. अनेक वेळा कोर्टात काम करताना पर्याय सूचत नाही. जेव्हा अयोध्येच काम माझ्या पुढे आले, त्यावेळी आम्ही तीन महिने अयोध्या प्रकरणावर विचार करत होतो. शेकडो वर्ष अयोध्या प्रकरणावर मार्ग सापडले नव्हता. ते काम आमच्यासमोर आले होते.

Ayodhya Verdict Result: अयोध्याचा निकाल देण्यापूर्वी देवा पुढे बसलो अन्... सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितला तो किस्सा
Dhananjaya Y. Chandrachud
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 2:59 PM

Dhananjaya Yeshwant Chandrachud: अयोध्या खटल्याचा निकाल देशाच्या इतिहासातील टर्निंग प्वाइंट होता. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निकाल दिला होता. निकाल देणाऱ्या घटनापीठात न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा समावेश होता. या खंडपीठातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. ते पुणे जिल्ह्यातील कनेरसर या आपल्या गावी आले होते. यावेळी त्यांनी अयोध्या खटल्याचा निकाल देताना काय केले? त्यासंदर्भातील किस्सा सांगितला.

काय म्हणाले सरन्यायाधीश

सरन्यायाधीस चंद्रचूड म्हणाले की, मी परंपरेमुळे नियमित पूजा करतो. अनेक वेळा कोर्टात काम करताना पर्याय सूचत नाही. जेव्हा अयोध्येच काम माझ्या पुढे आले, त्यावेळी आम्ही तीन महिने अयोध्या प्रकरणावर विचार करत होतो. शेकडो वर्ष अयोध्या प्रकरणावर मार्ग सापडले नव्हता. ते काम आमच्यासमोर आले होते. त्यावेळी मी माझी रोजची पूजा करताना भगवंतासमोर बसलो. त्यांना सांगितले मार्ग तुम्हीच शोधून द्या. आपली अस्था असेल, आपला विश्वास असेल तर भगवंतच मार्ग शोधून देतात, अशी भावना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली. ते आपल्या कनेरसर गावी आले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.

गावकऱ्यांचे मानले आभार

स्त्री सशक्तीकरणाच्या निर्णयामुळे देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. पाकिस्तान, चीन सीमेवर स्त्रिया कार्यरत आहे. देश बदलत चालला आहे. आम्ही आमच्या कोर्टात महिला सशक्तीकरणास वाव दिला. मला स्त्री सशक्तीकरणाचा प्रेरणा आईपासून मिळाली. माझ्या पणजींनी नऊ मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला. पणजी मोठ्या कुंकवाची आजी म्हणून मला आजही तिची आठवण येते. माझी पत्नी कल्पना दास स्त्री सशक्तीकरणासाठी काम करत आहे. आम्ही दोन मुलींना दहा वर्षापूर्वी दत्तक घेतले. त्या मुलींकडे पहावून मला मार्ग मिळतो. मी पुर्वजांमुळे आज इथपर्यत आलो आहे. दहा वर्षानंतर गावाला आलो.

हे सुद्धा वाचा

‘आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु’ या संत ज्ञानेश्वर यांच्या ओवीतून गावकऱ्यांचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी व्यक्त केला. गावकऱ्यांच्या सन्मानाने आपण भारावून गेले आहोत, असे त्यांनी म्हटले. काळ बदलतोय तसं आपण काळाबरोबर बदलतोय तशीच गावची प्रगती झाली आहे.

Non Stop LIVE Update
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी.
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले.
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी.
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?.
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?.
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे...
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे....
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश.
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्...
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्....
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट.