Loudspeaker Row LIVE Updates : पहाटे 5 आधीच बांग लावणाऱ्यांवर कारवाई कधी?- राज ठाकरे

| Updated on: May 14, 2022 | 5:47 PM

Azaan Loudspeaker Controversy LIVE Updates : औरंगाबादेतील सभेत दिलेल्या इशाऱ्यानंतर बुधवारी पत्रक जारी करत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Loudspeaker Row LIVE Updates : पहाटे 5 आधीच बांग लावणाऱ्यांवर कारवाई कधी?- राज ठाकरे
राज ठाकरे, मनसे अध्यक्षImage Credit source: TV9 Marathi

आज 4 मे 2022. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आजपासून राज्यभरात मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसेने उत्तर दिलं जाणार आहे. या बाबत राज ठाकरेंनी मंगळवारी पत्रक जारी करत सगळ्यांना महत्त्वाचं आवाहनही केलं होतं. तर दुसरकडे राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या अनुशंगानंने पोलिसांनीही कंबर कसली आहे. राज्यात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारचा दिवस महत्त्वपूर्ण असून, याच अनुशंगानं घडणाऱ्या सर्व घडामोडींचे ताजे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 May 2022 01:19 PM (IST)

    हमारे कार्यकर्त्यांओ का जो ‘धरपकड्या’ जो चल रहा है.. ‘

    हिंदीत पत्रकारांनी बोलण्याचं आवाहन केल्यानंतर राज ठाकरेंनी आधी टाळाटाळ केली मात्र त्यानंतर त्यांनी हिंदी बोलण्याचा प्रयत्न केला. आपल्या खास शैलीत त्यांनी हिंदी मराठीचं मिश्रण करत सुरुवात करताना केलेल्या वक्तव्यानं एकच हास्यकल्लोळ झाला.

    हमारे कार्यकर्त्यांओ का जो ‘धरपकड्या’ जो चल रहा है.. ‘.. असं विधान राज ठाकरेंनी केलं. त्यानंतर सगळेच पोट धरुन हसले.

  • 04 May 2022 01:14 PM (IST)

    92% ठिकाणी अजान झाली नाही म्हणून आम्ही खूश होऊ? अजिबात नाही! – राज ठाकरे

    92 टक्के ठिकाणी अजान झाली नाही, म्हणून आम्ही खूश होऊ? अजिबात नाही!

    राज ठाकरेंचा पुन्हा एकदा इशारा

    मोबाईलच्या काळात कशाला धरपकड करत आहात?

    60-70च्या दशकात असल्यासारखा विचार का करता?

    हा विषय एक दिवसाचा नाही.

    मुंबईतल्या 135 मशिदींवर पोलीस काय कारवाई करणार आहेत, हे एकदा समजून दे…

    ते त्यांच्या धर्माला घट्टा राहणार असतील तर आम्हालाही आमच्या धर्माला घट्ट राहावं लागेल…

  • 04 May 2022 01:11 PM (IST)

    रोजच्या रोज मशिदींनी परवानगी मागावी- राज ठाकरे

    मशिदींना 365 दिवस परवानगी दिलेली नाही. भोंगे उतरवा असं मी आधीच सांगितलं होतं.

    पोलिसांना फक्त डेसिबल मोजण्याचं काम आहे का…?

    मशिदीत प्रार्थना म्हणण्यासाठी माईक आणि लाऊडस्पीकर लागतो कशाला?

    अनधिकृत भोंगे उतरवले नाहीत, तर आंदोलन चालूच राहणार

    निर्णय लागत नाही, तोवर असंच चालत राहणार

    राज ठाकरेंंचा पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा

  • 04 May 2022 01:08 PM (IST)

    1140 पैकी 135 मशिदीत पहाटे 5च्या आधीच अजान झाली- राज ठाकरे

    विश्वास नांगरे पाटलांचा फोन आला होता, ते म्हणाले होते की कुणीही भोंग्यावर अजान लावणार नाही, आम्ही सगळ्यांशी बोललोय.

    मग 135 मशिदींवर पाचच्या आधीच अजान झाली, त्यांच्यावर कारवाई काय?

    दिवसभर जितक्याही वेळा अजान लावली जाते, तेव्हा आम्ही उत्तर हनुमान चालिसेनं देणार म्हणजे देणार

  • 04 May 2022 01:05 PM (IST)

    राज ठाकरे LIVE

    महाराष्ट्रातून आणि बाहेरुनही अनेकांचे फोन येत आहेत. पोलिसांचेही फोन येत आहेत.

    अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांना, मनसैनिकांनी ताब्यात घेतायत, नोटीस पाठवत आहेत.

    ही गोष्ट फक्त आमच्या बाबतीच का होते आहे, असा आम्हाला प्रश्न पडलाय.

    कायदा पाळणाऱ्यांना तुम्ही सजा देणार, आणि जे करत नाहीत, त्यांना मोकळीक देणार?

    राज ठाकरेंचा सवाल

    90-92 टक्के ठिकाणी अजान झाली नाही सकाळची – राज ठाकरे

  • 04 May 2022 12:58 PM (IST)

    संध्याकाळी सहा ऐवजी आता राज ठाकरेंची पत्रकार परिषद

    थोड्याच वेळात राज ठाकरेंची पत्रकार परिषद

    राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

  • 04 May 2022 12:51 PM (IST)

    संदीप देशांपांडे ज्या गाडीतून पळाले, त्या गाडीचं चाक पीआयच्या पायावरुन गेलं!

    संदीप देशपांडे ज्या गाडीने पळून गेले त्या गाडीच चाक शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील पीआय कासार यांच्या पायावरून गेलंय..

    पळून जाताना एका महिला कर्मचारी किरकोळ जखमी

    संदीप देशांपांडेंना ताब्यात घेताना हायव्होल्टेज ड्रामा

    पाहा व्हिडीओ

  • 04 May 2022 12:27 PM (IST)

    किशोरी पेडणेकर यांचा मनसेला टोला

  • 04 May 2022 11:58 AM (IST)

    Video : मुंबई हायव्होल्टेज ड्रामा! पोलिसांना चकवा देत, संदीप देशपांडे पसार

  • 04 May 2022 11:20 AM (IST)

    संदीप देशपांडेना ताब्यात घेण्याच्या पोलिसांचा प्रयत्न फसला

    संदीप देशपांडेना ताब्यात घेण्याच्या पोलिसांचा प्रयत्न फसला

    मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांनी ताब्यात घेताना पळ काढला

    दादर परिसरातून देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला

    राज्यात वेगवेगळ्या मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरुच

    आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनाही ताब्यात घेताना त्यांनी पळ काढला

    झटापटीत एक पोलीस रस्त्यावर कोसळला, संदीप देशपांडे पोलिसांच्या तावडीतून पळाले

    पाहा नेमकं काय झालं?

  • 04 May 2022 11:16 AM (IST)

    राज ठाकरे यांची 6 वा. पत्रकार परिषद

    राज ठाकरेंची संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद होणार

    भोंग्यांसंदर्भात पुढची काय भूमिका घेणार? हे स्पष्ट करण्याची शक्यता

    भोंग्याच्या भूमिकेवरुन मनसेचा अल्टिमेटम आज संपला

    राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी भोंगे वाजवणाऱ्या मशिदींना मनसेचं हनुमान चालिसेनं प्रत्युत्तर

    बहुतांश भागात भोंग्याचा वापर मशिदींनी टाळला

    तर काही भागात पहाटेची अजानच न झाल्याच्याही नोंदी

  • 04 May 2022 11:05 AM (IST)

    यवतमाळमध्ये सकाळची अजान झालीच नाही!

    यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच मशिदीवर सकाळची अजान झाली नाही

    शहरासह जिल्ह्यातील मशीद समोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

    शहरातील मोठ्या टांगा चौक मशीद परिसरात सुद्धा बंदोबस्त लावण्यात आला आहे

    मनसे चे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना स्थानबद्ध केलं

    देवा शिवरामवार अनिल हमदापुरे , विकास पवार हे भूमिगत असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

  • 04 May 2022 11:01 AM (IST)

    पुण्यात महाआरतीला सुरुवात, खालकर मारुती मंदिरातून लाईव्ह

  • 04 May 2022 11:00 AM (IST)

    धुळ्यात मनसे कार्यकर्त्यांना अटक

    धुळे शहरात भोंगे प्रकरणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यां घेतले तब्यात

    मशिदीवरील भोंगे उतरविन्यासाठी केल आंदोलन…

    मनसे कार्यकर्त्याना केली अटक..

    भोंगे देखील घेतले तब्यात

    हनुमान चालीसा पठण करण्या आधीच कार्यकर्ते तब्यात…

  • 04 May 2022 10:57 AM (IST)

    शरद पवार आणि गृहमंत्री वळसे पाटील यांच्या फोनवरुन चर्चा

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि एनसीपी नेते शरद पवार यांच्यात दूरध्वनीवर चर्चा

    राज्यातील मनसेच्या आजच्या भोंगे विषयी आंदोलन संदर्भात माहिती घेतील शरद पवार यांनी

    राज्यात कायदा सुव्यवस्था ठीक राहवी यासाठी काही सूचना केल्याचे समजते

  • 04 May 2022 10:45 AM (IST)

    थोड्याच वेळात शरद पवारांसोबत मविआ नेत्याची बैठक

    शरद पवार आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेते भेटणार

    सह्याद्री अतिथीगृह येथे सकाळी 11 वाजता बैठक

    राज्यातील राजकीय आणि प्रशाकीय कामकाज याची चर्चा

    एनसीपी अजित पवार, काँग्रेस बाळासाहेब थोरात यासह काही अन्य नेते उपस्थिती राहणार

  • 04 May 2022 10:44 AM (IST)

    राज ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची थोड्याच वेळाच पत्रकार परिषद

    राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष

    भोंग्याच्या भूमिकेवर राज ठाकरे काय बोलणार?

    मुस्लिम बांधावांच्या भूमिकेवर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देणार? याकडे लक्ष

  • 04 May 2022 10:40 AM (IST)

    मनसेच्या औरंगाबाद सभेविरोधात याचिका करणाऱ्याल 1 लाख दंड!

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेच्या विरोधात याचिका दाखल करणा-याला एक लाख रुपयांचा दंड

    मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नुकताच जाहीर केलाय निकाल

    याचिका निव्वळ राजकिय हेतूनं प्रेरीत असल्याचा हायकोर्टाचा ठपका

    जयकिशन कांबळे या याचिकाकर्त्याला दंडाची रक्कम विधी व न्यायविभागात जमा करण्याचे निर्देश

  • 04 May 2022 10:37 AM (IST)

    चिथावणीखोरांना भाजप बळ देतंय? संजय राऊतांचं सूचक विधान

    काल मी वर्षावर होतो. मुंबईत मशिदीवर भोंगे आहेत. त्यांनी परवानग्या घेतल्या आहेत. त्यांनी आवाजाचं पालन करण्याचं मान्य केलं. हाच नियम मंदिर आणि चर्चला आहे. इतर सार्वजिनक कार्यक्रमांना आहे. सर्वांनी पालन केलं. तर सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जाईल.

    सर्वोच्च न्यायालय पालन करत नसेल तर समान नागरी कायद्याची भाषा का करता? प्रत्येकाने धर्माच्या पलिकडे जाऊन कोर्टाचं पालन करावं. धर्माच्या वर कायदा आहे. आम्ही पालन करतो. इतरांनी पालन करावं.

    असं असताना कोणी चिथावणीची भाषा करत असेल तर समान नागरी कायद्याचं उल्लंघन आहे. महाराष्ट्रात कोणी चिथावणीची भाषा करत असेल अशा प्रकारे चिथावणईची भाषा करत असेल फक्त राजकीय स्वार्थासाठी केंद्रात बसलेला पक्ष अशा प्रकारे चिथावणीखोरांना बळ देत असेल तर मोदी देशाचे गृहमंत्री शहा यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. राज्य नाही तर देश अशांत होईल

  • 04 May 2022 10:36 AM (IST)

    आंदोलन आहे कुठे? आंदोलनाचा प्रश्नच येत नाही!, राऊतांनी मनसेला डिवचलं!

    मुंबईतून संजय राऊतांची मनसेच्या अल्टिमेटवर पहिली प्रतिक्रिया

    आंदोलन आहे कुठे आंदोलनाचा प्रश्नच येत नाही

    मुंबईचे पोलीय आयुक्त राज्याचे महासंचालक वळसे पाटील प्रत्येकाचं नियोजन आणि भूमिका पाहिली असेल तर भोंग्याबाबत कायद्याचं उल्लंघन झालं नाही.

    कशासाठी हाक दिली माहीत नाही. सुप्रीम कोर्टाने जे नियम घालून दिले आहे त्यानुसार काम केलं जात आहे. त्या पलिकडे कुणी जात असेल तर सरकार पाहून घेईल. मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्यावर आंदोलन करावं ,अशी परिस्थिती बिघडली नाही

  • 04 May 2022 10:35 AM (IST)

    नांदेडमधील अजानचे अपडेट्स

    शहरासह जिल्ह्यात बहुतांश मशिदीत 5:30 वाजता शांततेत पार पडली आजान

    जिल्हाभरात मनसेच्या अल्टीमेटमचा कुठलाही प्रभाव आढळून आलेला नाही,

    शहरासह ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे शांततेत सुरू

    शहरात पोलीस बंदोबस्त तैनात ,जिल्ह्यात सर्वत्र शांतता

  • 04 May 2022 10:31 AM (IST)

    संजय राऊत LIVE

    मशिदींवरील भोंगे आणि मनसेच्या भूमिकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

  • 04 May 2022 10:27 AM (IST)

    गडचिरोलीतून अजानची महत्त्वाची अपडेट

    गडचिरोली जिल्ह्यासह बारा तालुक्यात शांतता

    गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ठिकाणी व दुर्गम भागात झाली शांततेत पहाटेची नमाज पार पडली

    जिल्ह्यातील बारा तालुक्यातील पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक अंकित गोयल निदर्शने व सूचना

    शांतता राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त

  • 04 May 2022 09:02 AM (IST)

    मुंबईच्या लोकलमध्येही वाचली हनुमान चालिसा

    मुंबईच्या ट्रेनमध्येही आज हनुमान चालिसा लावण्यात आली…

    भजन मंडळींनी वाचली हनुमान चालीसा…

  • 04 May 2022 08:52 AM (IST)

    औरंगाबादेत मनसे इफेक्ट, भोंग्याचे नियम पाळले गेल्यानं आनंद

    औरंगाबाद शहरातील मस्जिदींमध्ये अत्यंत कमी आवाजात पार पडली अजाण

    काही ठिकाणी तर भोंग्यांशिवाय पार पडली अजाण

    कमी आवाजात अजाण झाल्यामुळे मनसे ने व्यक्त केले आभार

    मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी ट्विट करून मानले आभार

    ज्यांनी आमच्या विचारांना पाठिंबा दिला त्यांचे मानले आभार

    सुमित खांबेकर यांनी केलं अभाराचे ट्विट

  • 04 May 2022 08:14 AM (IST)

    Video : ‘अजानच लागली नाही, म्हणून हनुमान चालिसाही लावली नाही’

    मुस्लिम बांधवांनी संमजसपणा दाखवला, त्यांचं कौतुक आहे- संदीप देशपांडे

    ‘जिथं अजान झाली नाही, तिथे हनुमान चालिसा लावण्याचा प्रश्नच येत नाही’

    मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिकली जपली- मनसे नेते संदीप देशपांडे

    पाहा व्हिडीओ नेमकं काय म्हणाले?

  • 04 May 2022 08:00 AM (IST)

    VIDEO : नेरुळमध्ये मशिदसमोर मनसेकडून हनुमान चालिसेचं पठण

  • 04 May 2022 07:45 AM (IST)

    Video : संजय पांडे यांच्याकडून मुंबईत पाहणी

  • 04 May 2022 07:43 AM (IST)

    औरंगाबाद : नोटीस आणि गुन्हा दाखल झाल्यानं कार्यकर्ते भूमिगत

    औरंगाबाद शहरातील मनसेचे कार्यकर्ते झाले भूमिगत

    149 च्या नोटीस आणि गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते भूमिगत

    अटक होऊ नये यासाठी मनसे कार्यकर्ते झाले भूमिगत

    जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर आणि राजीव जावळीकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते झाले भूमिगत

  • 04 May 2022 07:21 AM (IST)

    नेरुळमधील मशिद परिसरात मनसेकडून हनुमान चालिसेचं पठण

    नवी मुंबईमध्ये मनसैनिक आक्रमक

    नेरुळ च्या मशिद परिसरात मनसेकडून हनुमान चालिसेचं पठण

    अजान सुरू असताना स्पिकर्सचा वापर करत मनसैनिकांनी केलं चालिसेचं पठण

    मशिद परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा

  • 04 May 2022 07:16 AM (IST)

    नाशकात मनसैनिकांवर पोलिसांची मोठी कारवाई

    नाशकात मनसैनिकांवर पोलिसांची मोठी कारवाई

    14 जणांना दिली ताडीपारीची नोटीस

    तर 100 हुन अधिक जणांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस

    आतापर्यंत 29 हुन अधिक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

  • 04 May 2022 07:12 AM (IST)

    मालेगावात मशिदींमध्ये भोग्यांविनाच अजान 

    मालेगावात मशिदींमध्ये भोग्यांविनाच अजान

    मुस्लिम बहुल मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात पोलीस यंत्रणा सतर्क

    सर्व वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून

  • 04 May 2022 07:02 AM (IST)

    पुण्यात शांततेत अजान, प्रत्येक मशिदीबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

    पुण्यात सर्व ठिकाणी पहाटेची अजान नियमितपणे शांततेच्या वातावरणात पार पडली

    प्रत्येक मशिदीबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

    तर नाना पेठेतील चांदतारा मशीद परिसरात पोलिसांचे पायी पेट्रोलिंग

  • 04 May 2022 06:54 AM (IST)

    कांदिवलीत अजानवेळी हनुमान चालिसेचं पठण? व्हिडीओ जुना, पोलीस उपायुक्तांची माहिती

    मुंबई :  कांदिवली पश्चिम चारकोप विधानसभेच्या संजय नगरमध्ये मनसेतर्फे अजानच्या वेळी हनुमान चालीसाचे पठण करण्यात आल्याचा एक व्हिडीओ आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ आज सकाळचा आहे. संजय नगर, गांधी नगर येथील मशिदीतून अजानच्या वेळी व्हिडीओ बनवण्यात आला होता. दरम्यान, झोन 11 चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितले की, अजानच्या वेळी हनुमान चालीसा वाजवतानाचा व्हिडिओ आजचा नाही.

  • 04 May 2022 06:47 AM (IST)

    जामा मशिदसमोर पूर्णपणे शांतता

    जामा मशिदसमोर पूर्णपणे शांतता

    दुसरी नमाज दुपारी 1 वाजता होणार

    पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे

  • 04 May 2022 06:25 AM (IST)

    नाशकात मनसैनिकांकडून हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न

    नाशिक – मनसैनिकांकडून हनुमान चालीसा लावण्याचा केला प्रयत्न

    जुने नाशिक परिसरातील जबरेश्वर मंदिरात हनुमान चालीसा लावण्याच्या प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

    स्पीकर, वायर आणि इतर साहित्य पोलिसांकडून जप्त

  • 04 May 2022 02:00 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबई पोलिसांची नोटीस

  • 04 May 2022 01:50 AM (IST)

    नांदेड मध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस

    नांदेड मध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस.

    शहरासह जिल्ह्यातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांना 149 कलमान्वये बजावली नोटीस.

    कोणत्याही धार्मिक स्थळी भोंगा ,dj साऊंड लावून नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा दिला इशारा.

    कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहील दिलेल्या नोटिस मध्ये नमूद.

  • 04 May 2022 01:10 AM (IST)

    मुंबईत नेमक्या किती मशिदींना भोंग्यासाठी परवानगी?

    राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुंबईतभोंग्यांच्या परवानगीसाठी किती अर्ज आणि परवानग्या किती? असा प्रश्नही उपस्थित झाला होता. याबाबतची आकडेवारीही समोर आली आहे. वाचा सागर जोशी यांचा रिपोर्ट – इथे क्लिक करा. 

  • 04 May 2022 01:06 AM (IST)

    राज ठाकरेंनी आत्महपरीक्षण करावं- राजेश टोपे

    आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची राज ठाकरेंवर टीका, राज ठाकरेंना आत्मपरीक्षणाची गरज असल्याच म्हणत टोला

  • 04 May 2022 01:02 AM (IST)

    भिवंडीतही मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस

    भिवंडीत मनसे प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीस

    शहराध्यक्ष मनोज गुळवी हे नॉट रीचेबल असल्याने त्यांनी नोटीस स्वीकारली नाही .

  • 04 May 2022 01:01 AM (IST)

    महाराष्ट्रात राडा होणार?, राज ठाकरे मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवर ठाम

    मुंबई, पुण्यात आणि ठाण्यासह राज्यभरात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. ठाण्याचे मनेसेचे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्र्यातील मशिदीवरील भोंग्यांबाबत इशारा दिला आहे, भोंगे वाजले तर मुंब्र्यात दाखल होऊ, असा इशारा जाधव यांनी दिला आहे. तर पुण्यातही मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनीही सरकारला इशारा दिला आहे.वाचा सागर जोशी यांचा रिपोर्ट – इथे क्लिक करा

  • 04 May 2022 12:59 AM (IST)

    पहाटेपासून तगडा पोलीस बंदोबस्त

    राज्यात सध्या मशीदीवरील लाऊडस्पीकर विरुद्ध हनुमान चालीसा असा संघर्ष सुरू आहे, अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा तसे लेखी आदेश मनसैनिकांना काढल्याने हा मुद्दा आणखी तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून अजानवेळी हनुमान चालीसा लावल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. मशीदीवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावणार आहेत. तसेच ऐकणार नसाल तर धर्माला धर्मानेच उत्तर देऊ असाही इशारा राज ठाकरे यांनी पुन्हा दिला आहे.

    मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आता अलर्ट मोडवर आलेत. पाहटेपासून शहरात तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. कारण पोलीस तैनात असले तरी मनसे गनिमी काव्याने अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सरकारवर आणि पोलिसांवर असणार आहे.

  • 04 May 2022 12:59 AM (IST)

    पत्रकाद्वारे राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं? वाचा

  • 04 May 2022 12:50 AM (IST)

    दोन तास राज ठाकरेंची बाळा नांदगावकरांसोबत चर्चा

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत सुमारे दोन तास चाललेल्या भेटीनंतर बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर राज ठाकरे यांच्या बंगल्यातून निघाले.

    बाळा नांदगावकर म्हणाले की, पोलिसांनी राज ठाकरेंना नोटीस दिली आहे, काय करायचे ते मनसे कार्यकर्ते बघतील

Published On - May 04,2022 12:48 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.