ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर…बबनराव तायवाडे यांचा थेट इशारा

maratha and obc reservation maharashtra | मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नयेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणारी भुमिका या अधिवेशनात सरकारने घेतली तर ओबीसी पेटून उठेल...असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिला.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर...बबनराव तायवाडे यांचा थेट इशारा
babanrao taywade Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 12:57 PM

गजानन उमाटे, नागपूर, दि. 20 फेब्रुवारी 2024 | मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा विरोध नाही. आज जे १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद करत आहे. याबद्दल सरकारचे अभिनंदन करत आहोत. परंतु ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तसेच मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नयेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणारी भुमिका या अधिवेशनात सरकारने घेतली तर ओबीसी पेटून उठेल, ओबीसी रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिला.

काय म्हणाले बबनराव तायवाडे

मंत्रिमंडळाने संमत केलेल्या विधेयकानुसार मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण मिळणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात ज्या त्रुटी दाखवल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच मागसवर्ग आयोगाने ज्या शिफारशी केल्या त्या मान्य करण्यात आल्या आहेत. मसुद्यानुसार, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मराठा समाजाला न्यायालयाच्या कसोटीवर उतरणारे आरक्षण देणार असल्याचे सरकारने म्हटले होते.

मनोज जरांगे यांनी भूमिका बदलावी

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. परंतु त्यांनी ही भूमिका बदलायला हवी. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही तर आम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही. मंत्रिमंडळ बैठकीत संमत झालेला पूर्ण अहवाल आल्यावर आल्यावर आपण अभ्यास करुन बोलणार आहोत. सगे सोयऱ्याबाबत कायदा करण्यापूर्वी हरकती आणि सूचनांवर सुनावणी करण्यात यावी, असे तायवाडे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणारी भुमिका अधिवेशनात सरकारने घेतली तर ओबीसी पेटून उठेल, ओबीसी रस्त्यावर उतरेल, असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला. मराठा समाजाला न्यायालयाच्या कसोटीवर खरे उतरणारे आरक्षण देणार असे सरकारने म्हटले होते. यामुळे सरकार आरक्षण देईल, असा विश्वास आम्हाल आहे. आंदोलनकर्त्यांनी कितीही आंदोलन केले तरी संविधानानुसारंच सरकार मागणी मान्य करु शकते, असे तायवाडे यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा

ओबीसीत आरक्षण नाहीच, जरांगे यांच्या मूळ मागणीला वाटाण्याच्या अक्षता, मसुद्यात नेमके काय

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.