Bageshwar Baba : संत तुकाराम यांच्याविषयी माफी मागताना बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले?

संत तुकाराम (Sant Tukaram) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मध्य प्रदेशातील धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज ऊर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी अखेर माफी मागितली आहे.

Bageshwar Baba : संत तुकाराम यांच्याविषयी माफी मागताना बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 9:25 PM

रायपूर : संत तुकाराम (Sant Tukaram) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मध्य प्रदेशातील धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज ऊर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी अखेर माफी मागितली आहे. बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाकडून आक्रमक प्रतिक्रिया आल्या होत्या. शिवाय महाराष्ट्रातील भाजप (BJP) नेत्यांकडूनही बागेश्वर महाराजांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी करण्यात येत होती. तसेच इतर पक्षातील नेत्यांकडूनही बागेश्वर महाराजांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला जात होता. अखेर वाढता विरोध आणि टीका लक्षात घेता बागेश्वर महाराजांना उपरती झालीय. त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य मागे घेतलं आहे. संत तुकाराम हे महान संत आहेत. ते आपले आदर्श आहेत. आपल्याला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. आपण पुस्ताकात एक गोष्ट वाचली होती. त्याचाच उल्लेख आपण केला होता. पण मी माझे शब्द मागे घेतो, अशा शब्दांत बागेश्वर महाराजांनी आपले शब्द मागे घेतले आहेत.

“संत तुकाराम महाराज हे महान संत आहेत. मी एका पुस्तकात त्यांच्याशी संबंधित एक गोष्ट वाचली होती. त्यांच्या पत्नी विचित्र स्वभावाच्या होत्या. मी त्यांच्या ऊसाच्या टिपऱ्याचीही गोष्ट एका पुस्तकात वाचली होती”, असं बागेश्वर बाबा म्हणाले.

“संत तुकारामांच्या पत्नी त्यांना एकदा ऊस आणायला पाठवतात. पण ऊस आणल्यानंतर त्याच ऊसाने त्यांच्या पत्नी त्यांना मारतात. यामध्ये ऊसाचे दोन तुकडे होतात. ही कहानी मी आपल्या परिने भाविकांना सांगितली. पण आपल्या कहाणीमुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेतो”, असं बागेश्वर महाराज म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बागेश्वर बाबा याचं वादग्रस्त वक्तव्य नेमकं काय होतं?

“संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे.”

“त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय….”

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....