बाळासाहेब थोरात रायगड दौर्‍यावर, नागावमध्ये वादळग्रस्तांना दहा हजाराचा चेक

निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान केले आहे. पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत (Balasaheb Thorat Visit Cyclone Nisarga Affected Raigad Economic Help to Nagaon Residents)

बाळासाहेब थोरात रायगड दौर्‍यावर, नागावमध्ये वादळग्रस्तांना दहा हजाराचा चेक
Follow us
| Updated on: Jun 13, 2020 | 4:12 PM

अलिबाग : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रायगड दौर्‍याला अलिबाग तालुक्यातून सुरुवात झाली. त्यांनी नागांवमध्ये निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच काही नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही केले. (Balasaheb Thorat Visit Cyclone Nisarga Affected Raigad Economic Help to Nagaon Residents)

निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान केले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज (शनिवार 13 जून) जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. अलिबाग तालुक्यात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम नागांव येथील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली.

पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसिलदार सचिन शेजाळ यांचीही यावेळी त्यांच्यासोबत उपस्थिती होती.

हेही वाचा : तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार : बाळासाहेब थोरात

थोरात यांनी नागाव येथील नुकसानीची पाहणी केली. तसेच वादळग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी नागाव ग्रामपंचायतीमधील काही नुकसानग्रस्त नागरिकांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले.

नागांवनंतर थोरात चौल, मुरुड तालुक्यातील काशिद येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर मुरुड येथे अधिकार्‍यांसमवेत चर्चा, श्रीवर्धनमधील दिघी बंदर, म्हसळ्यातील तुरुंबडी येथे नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन तेथील पाहणीही करणार आहेत.

हेही वाचा :  फडणवीसांकडून 10 हजारांच्या मदतीची मागणी, मात्र वादळग्रस्तांच्या खात्यात सोमवारपासून 20 हजार जमा होणार : वडेट्टीवार

दरम्यान, सत्तेत सहभागी असूनही काँग्रेसला विचारात घेतले जात नसल्याने पक्षाचे नेते नाराज आहेत. तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार आहे, असं सूचक उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलं. सोमवारी थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही थोरातांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Cyclone Nisarga | मुंबईवरचा धोका टळला, चक्रीवादळ पुढे सरकले : हवामान विभाग

Cyclone Nisarga | नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील घाट रस्त्यात दरड कोसळली

(Balasaheb Thorat Visit Cyclone Nisarga Affected Raigad Economic Help to Nagaon Residents)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.