बल्लारपूर विधानसभा: मुनगंटीवार बालेकिल्ला राखणार का ?

विधानसभेच्या निवडणूकांसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. बल्लारपूर या मतदार संघात प्रथमच 20 उमेदवार नशीब आजमावित आहेत. परंतू मुख्य लढत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि कॉंग्रेसचे संतोष सिंह रावत आणि कॉंग्रेसच्या बंडखोर डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्यात होणार आहे.

बल्लारपूर विधानसभा: मुनगंटीवार बालेकिल्ला राखणार का ?
Ballarpur Assembly: Will Mungantiwar retain the fort?
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 2:17 PM

बल्लारपूर विधानसभा मतदार संघ हा चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या सहा मतदार संघापैकी एक मतदार संघ आहे. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात यंदा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महायुती सरकारमधील वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवित आहेत. त्यांची मुख्य लढत कॉंग्रेसचे संतोष सिंह रावत यांच्याशी होणार आहे. कॉंग्रेसमध्ये डॉ.अभिलाषा गावतुरे आणि प्रकाश पाटील मारकवार अशी दुहेरी बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मतविभाजनाचा मोठा धोका आहे. या मतविभाजनाचा फायदा सुधीर मुनगंटीवार यांना होतो का ? हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

पराभवाचा वचपा काढणार का ?

साल 2009 पासून सलग तीन वेळा भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचा विजय झालेला आहे. आता ते चौथ्यांदा निवडणूकीला उभे आहेत. लोकसभा निवडणूकीला चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून त्यांचा पराभव झाला होता. लोकसभेला स्वत:च्या बल्लारपूर मतदार संघातून सुधीर मुनगंटीवार हे 48 हजार मतांनी पिछाडीवर पडले होते. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत ही पिछाडी भरुन काढण्याचे मोठे आव्हान मुनगंटीवार यांच्या समोर आहे. दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसमध्ये झालेली दुहेरी बंडखोरी सुधीर मुनगंटीवार यांच्या फायद्याची ठरु शकते.

बल्लारपूर विधानसभा निवडणूक निकाल 2019

हे सुद्धा वाचा
उमेदवाराचे नावपक्षाचे नावमतदान व्होट शेअऱ
सुधीर मुनगंटीवार भाजपा86,002 42.90 टक्के
डॉ.विश्वास आनंदराव जाडेकॉंग्रेस 52,76226.32 टक्के
राजू चिन्नया झोडे वंचित बहुजन आघाडी 39,95819.93 टक्के

जातीय गणित काय ?

बल्लारपूर मतदार संघात एकूण 3 लाख 12 हजार 355 मतदार आहेत. या मतदार संघात कुणबी, तेली, माळी आणि दलित समाजाचा पगडा आहे. तसेच या मतदार संघात आदिवासी समाजाचे देखील मोठे प्रमाण आहे.लोकसभा निवडणूकीत चंद्रपूर मतदार संघात भाजपाने सुधीर मुनगंटीवार यांना उभे केले होते. भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभा निवडणूकीत पराभव होऊन कॉंग्रेसच्या प्रतिभा बाळू धानोरकर यांचा विजय झाला होता. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीत आपला बालेकिल्ला राखण्याचे आव्हान सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढे उभे ठाकले आहे.

बल्लारपूर विधानसभा निवडणूक निकाल 2014

उमेदवाराचे नावपक्षाचे नाव मतदान
सुधीर मुनगंटीवारभाजपा1,03,718
घनश्याम खुशीमल मूलचंदानीकॉंग्रेस 60,118
राजेश दुर्गासिंह सिंहबीएसपी10,344

वन्यप्राणी आणि मानवाचा संघर्ष

बल्लारपूर विधानसभा मतदार संघात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा बहुतांश भाग मोडतो. या मतदार संघात बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे. येथील वनविभागामुळे वाघ,बिबटे आणि अन्य प्राण्यांचा मानवी संघर्ष सतत होत असतो. तसेच वन्य प्राण्यांमुळे शेतीचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असते. रात्री-बेरात्री या भागात जंगलातील वन्यप्राणी गावात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतांना पाणी देताना जीव मुठीत घेऊन वावरावे लागते. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

बल्लारपूर विधानसभा निवडणूक निकाल 2009

उमेदवाराचे नाव पक्षाचे नावमतदान
सुधीर मुनगंटीवार भाजपा86,196
राहुल नरेश पुगलिया कॉंग्रेस 61,460
विनोद गजानन अहिरकरअपक्ष10,921

मतविभाजनावर मदार

भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सलग तीन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकलेली आहे. त्यामुळे निवडणूका जिंकण्याचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. बल्लारपूर विधानसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवित आहेत. प्रत्येक गावातील शिल्लक कामे निधी आणून पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिलेले आहे. त्यांची मुख्य लढत ज्यांच्याशी होत आहे ते कॉंग्रेसचे उमेदवार संतोष रावत हे चंद्रपूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी जिल्हा बॅंकेतील नोकर भरतीचा मुद्दा निवडणूकीत प्रचारासाठी वापरला आहे. परंतू आचारसंहितेमुळे नोकरभरतीला स्थगिती मिळाल्याने त्यांची निराशा झाली आहे. कॉंग्रेसमध्ये डॉ. अभिलाषा गावतुरे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार अशी दुहेरी बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या मतांचे मतविभाजन झाले तर त्याचा फायदा भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना फायदा होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

अनेक योजना वादग्रस्त ठरल्या

सुधीर मुनगंटीवार हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून मंत्री देखील आहेत. त्यांनी अनेक वर्षे चंद्रपूरचे पालक मंत्री पद म्हणूनही काम केलेले आहे. ते बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून सहा वेळा आमदारकी जिंकली आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्र्‍यासारखे महत्वाचे खातेही मिळाले होते. राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक लोकप्रिय योजना राबवलेल्या आहेत. त्याच्या काही योजना वादग्रस्त देखील ठरल्या आहेत. त्यात वृक्षारोपण तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे लंडन येथून आपण्याच्या योजनांचा समावेश आहे.

ओबीसी विरुद्ध मराठा वादाचा यंदा प्रभाव

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ओबीसी मतदारांची लोकसंख्या मोठी आहे. येथील बहुसंख्य असलेला ओबीसी समाज एकवटला आहे. आता मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका येथेही लोकसभा निवडणूकीत भाजपाला बसला होता. भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभा 2024 च्या निवडणूकीत पराभव झाला होता. आता विधान सभा निवडणूकीतही या वादाचा फटाक सत्ताधारी पक्षाला बसू शकतो असे म्हटले जात आहे. कारण मराठ्यांना ओबीसीतून सर्टीफिकेट देण्याचा सरकारने घेतलेला निर्णय ओबीसींना आवडलेला नाही. चंद्रपूरातून या निर्णयाला ओबीसींचा सर्वाधिक विरोध झाला होता. त्यामुळे 2024 लोकसभा निवडणूक याच मुद्द्यावर लढली गेली होती. अल्पसंख्यांक विरुध्द बहुसंख्य ओबीसी अशी ही लढत झाल्याने मुनगंटीवार यांचा लोकसभेत पराभव होऊन प्रतिभा धानोरकर निवडून आल्या होत्या.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.