मी अजित आशाताई अनंतराव पवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की मुख्यमंत्री म्हणून… निकालापूर्वीच बारामतीत बॅनरबाजी

बारामतीमध्ये भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले अजित पवार यांचे बॅनर लागले आहेत. मी अजित आशाताई अनंतराव पवार ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून... असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे.

मी अजित आशाताई अनंतराव पवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की मुख्यमंत्री म्हणून… निकालापूर्वीच बारामतीत बॅनरबाजी
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 6:08 PM

बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. उद्या शनिवारी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे, मात्र निवडणूक निकालापूर्वीच भावी मुख्यमंत्री असा अजित पवार यांचा उल्लेख असलेलं फलक बारामतीमध्ये लावण्यात आलं आहे. ‘मी अजित आशाताई अनंतराव पवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून…’ असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

नदीम शेख मित्रपरिवाराच्या वतीनं बारामतीतील भिगवन रस्त्यावर हा फलक लावण्यात आला आहे. बारामती भिगवन रस्त्यावर सहयोग सोसायटी जवळ हा फलक लावण्यात आलेला आहे. या फलकामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे.  ‘मी अजित आशाताई अनंतराव पवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून…’ असा उल्लेख या बॅनरवर आहे.

दरम्यान दुसरीकडे निवडणूक निकालापूर्वीच सोलापूर शहर उत्तर मध्ये भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत. भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांकडून  ‘विजयी भव:’चे बॅनर लावण्यात आले आहेत. सोलापुरातील शेळगी परिसरामध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत. विजयकुमार देशमुख हे पाचव्यांदा भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात भाजपचे विजयकुमार देशमुख विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेश कोठे यांच्यात चुरशीची लढत झाली आहे, त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

भोरमध्ये देखील अशाच प्रकारचे बॅनर लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकाला आधीच पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर भोरमध्ये झळकले आहेत.  पुणे सातारा महामार्गावरील वेळू, शिंदेवाडी गावाच्या हद्दीत हे बॅनर लागले आहेत. भोर विधानसभा महाविकास आघाडीच्या वतीनं हे बॅनर लावण्यात आले आहेत.

भोर विधानसभा मतदारसंघातून संग्राम थोपटे तीन वेळा निवडून आले आहेत, यंदा ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे विरुद्ध महायुतीचे शंकर मांडेकर अशी लढत आहे. मात्र महायुतीच्या दोन बंडखोरांनी या मतदारसंघात शंकर मांडेकर यांच्यासमोरील आव्हान वाढवलं आहे.  किरण दगडे आणि कुलदीप कोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.