रोहित पवार यांच्या राजकीय शत्रूच्या घरी जाणार पार्थ पवार; पार्थ यांचे बॅनर्स झळकले
ajit pawar and parth pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राम शिंदे यांच्यात राजकीय कुरघोडी नेहमी सुरु असते. आता दोन आमदारांमधील वादात दोन भाऊ येणार का? कारण रोहित पवार यांच्या मतदार संघात पार्थ पवार येत आहे. यामुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.
कुणाल जयकर, अहमदनगर | 16 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांच्यातील वाद अहमदनगर जिल्ह्यात नाही तर राज्यात सर्व प्रचलित आहे. दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. मध्यंतरी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड एमआयडीसीवरून दोन आमदारांमध्ये वाकयुद्ध चांगलेच रंगले होते. दोन्ही आमदारांमधील हा वाद परिवारात येण्याची चिन्ह दिसू लागली आहे. आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात पार्थ पवार यांचे स्वागताचे बॅनर लागले आहेत. यानंतर यासंदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत.
का सुरु झाली चर्चा
भारतीय जनता पक्षाचे आमदार राम शिंदे यांच्या कार्यक्रमाला अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हजेरी लावणार आहे. त्यासाठी रोहित पवार यांच्या मतदार संघात पार्थ पवार यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले आहे. या बॅनर्सवर पार्थ पवार आणि राम शिंदे यांचे मोठे फोटो लावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे फोटो आहेत. विशेष म्हणजे रोहित पवार यांचा हा मतदार संघ असून त्यात पार्थ पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
पार्थ पवार आणि रोहित पवार भाऊ
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली. त्यानंतर पार्थ पवार त्यांचे पुत्र पार्थ पवार यांची चांगलीच चर्चा सुरु झाली. पार्थ पवार २०१९ विधानसभा निवडणूक मावळमधून लढवली होती. परंतु त्यात त्यांचा पराभव झाला होता. रोहित पवार यांनी अचूक टायमिंग साधत शरद पवार यांच्या पाठिशी राहिले. त्यानंतर ते कर्जत जामखेडा मतदार संघातून निवडून आले. बंडखोरी केल्यानंतर रोहित पवार सातत्याने शरद पवार यांच्या पाठिशी राहिली. रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यात जो कोणी कर्तृत्ववान असेल तो राजकारणात पुढे येईल, असे आजोबा शरद पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर रोहित पवार राज्यभर चमकू लागले आहे. परंतु पार्थ पवार अजूनही चमकत नाही. यामुळे रोहित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक राम शिंदे यांच्या मतदार संघात तर पार्थ राम शिंदे येत नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे.
भाजप आमदार राम शिंदे यांचा दिवाळी फराळाचा कार्यक्रम नुकताच झाला. त्यालाही अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी हजेरी लावली. आजची भेट म्हणजे कुठलाही राजकीय संबंध नाही, असे आमदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितले.आम्ही ठरवून फराळाच्या निमित्त एकत्र आलो आहोत, असे त्यांनी म्हटले.