यूपीएससी परीक्षेत बार्टीचा झेंडा, 9 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या खास शुभेच्छा

यूपीएससी परीक्षेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल 9 परीक्षार्थीनींही घवघवीत यश संपादन केले आहे.

यूपीएससी परीक्षेत बार्टीचा झेंडा, 9 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या खास शुभेच्छा
BARTI AND DHANANJAY MUND
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 4:57 PM

मुंबई : यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल 9 परीक्षार्थीनींही यावेळी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सध्याची कोरोना साथ तसेच ऑनलाईन शिकवणी या सर्व गोष्टींना आत्मसात करत या परीक्षार्थींनी यशाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या जिद्दीचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक केले आहे. त्यांनी या विद्यार्थ्यांना ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. (barti student crack upsc 2020 exam dhananjay munde congratulate them)

बार्टीच्या 9 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

बार्टी या संस्थेकडून अनुसूचित जातीतील गरीब तसेच होतकरू विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या मदतीने स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, सध्याची कोरोनास्थिती तसेच ऑनलाईन शिवकणी यामुळे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी थोडे विचलित झाले होते. मात्र हार न मानता या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. तसेच बार्टीच्या तब्बल 9 विद्यार्थ्यांनी यूपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केले. यामध्ये सुहास गाडे (रँक-349),आदित्य जीवने (रँक-399),शरण कांबळे (रँक-542),अजिंक्य विद्यागर (रँक-617),हेतल पगारे (रँक-630), देवरथ मेश्राम (रँक-713),स्वप्नील निसर्गन (रँक-714),शुभम भैसारे (रँक-727) आणि पियुष मडके (रँक-732) या भावी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे धनंजय मुंडे यांनी आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, असे म्हणत अभिनंदन केले आहे.

चंद्रपूरच्या आदित्य जिवनेने करुन दाखवलं

आदित्य चंद्रभान जीवने या 25 वर्षीय युवकानेदेखील बार्टी या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले आहे. तो मुळचा चंद्रपूरचा आहे. मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या आदित्यने 399 अखिल भारतीय रँकिंग मिळविले आहे. आदित्यचे वडील आनंदवन संचालित आनंद निकेतन महाविद्यालयात प्राध्यापक तर आई शिक्षिका आहे. गुरुजन आणि कुटुंबियांमुळेच आपल्याला युपीएससीमध्ये हे यश मिळाल्याचे सांगत समाजासाठी उत्तम काम करण्याची इच्छा आदित्यने दर्शविली आहे. वरोरा शहरातील प्रथम युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी असा बहुमान देखील त्याने मिळविला असून त्याचे जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.

इतर बातम्या :

UPSC Civil Services Main 2020 Result : यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण 761 परीक्षार्थी उत्तीर्ण

UPSC Result 2021 | युपीएससीत लातूरच्या सेव्हनस्टार्सचे अभूतपूर्व यश, जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

दुसऱ्यांदा UPSC परीक्षेत यश, यंदा रँकमध्येही सरशी, उस्मानाबादच्या निलेशची गगनभरारी!

(barti student crack upsc 2020 exam dhananjay munde congratulate them)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.