बीड हे महाराष्ट्रातील राजकारणाचे प्रमुख केंद्र आहे. मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे. 2011 च्या जनगणनेनुसार बीडची लोकसंख्या 25 लाख 9 हजार आहे. बीडमध्ये एकूण 10 तालुके आहेत. किल्ले धारूर, अंबेजोगाई, परळी-वैद्यनाथ, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर आणि वडवणी हे आहेत. बीडची मुख्य भाषा मराठी आहे. मात्र, येथे हिंदी देखील मोठ्या प्रमाणात बोलली जाते. बीडला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये अंदाजे दीडशे साखर कारखाने आहेत. त्यासाठी 12 ते 13 लाख ऊसतोड मजूर लागतात. विशेष म्हणजे त्यापैकी आठ लाख मजूर एकटा बीड जिल्ह्यातून जातात. बीड जिल्हातील परळी येथे थर्मल पावर देखील आहे. बीडमध्ये बीड एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी आष्टी विधानसभा मतदारसंघ, केज विधानसभा मतदारसंघ, परळी विधानसभा मतदारसंघ, गेवराई विधानसभा मतदारसंघ आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघ आहेत. परळीमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वैजनाथ आहे.
बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा