AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, बीडमध्ये राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, केकही कापला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा देशातील जनतेसाठी मोठा एप्रिल फुल आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

Beed | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, बीडमध्ये राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, केकही कापला
बीडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 11:53 AM
Share

बीड | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednra Modi) यांचा आज वाढ दिवस आहे. यानिमित्ताने बीड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज उपहासात्मक आंदोलन केलं आहे. आज एक एप्रिल (First April) म्हणजे एप्रिल फुलच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्यामुळे अवघ्या देशातील जनतेची फसवणूक पंतप्रधानांनी चालवली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. बीडममधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (Beed Agitation) एकत्र येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सध्याच्या महागाईला जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

‘हा वाढदिवस म्हणजे जनतेसाठी एप्रिल फुल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा देशातील जनतेसाठी मोठा एप्रिल फुल आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. बीडमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यानिमित्त केकही कापला. त्यानंतर तो केक या कार्यकर्त्यांनी आपापसात वाटून खाल्ला.

काय म्हणाले राष्ट्रवादी युवक काँग्रसचे कार्यकर्ते?

या आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, ‘ या लबाड माणसाचा वाढदिवस आम्ही एप्रिल फुलचे औचित्य साधून करत आहोत. पंतप्रधान साहेबांनी युवकांची फसवणूक , जनतेची, महिलांची फसवणूक केली आहे. हा एकपात्री अभिनय करून दिशाभूल करून ते आज सत्तेवरती आहेत. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. याच उद्देशाने आम्ही बीड जिल्ह्यात त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत.

इतर बातम्या-

Misal pe charcha : कोल्हापूरच्या थेट पाइपलाइनच्या घोषणेचं काय झालं? सतेज पाटलांसह काँग्रेसवर बरसले चंद्रकांत पाटील

Washim Crime | वाशिमच्या रुग्णालयात मेस कामगाराची आत्महत्या, गळफास लावून संपविले जीवन

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.