क्रूरतेचा कळस!! पारधी महिला घरासमोर फिरतेय म्हणून अंगावर सोडला कुत्रा, जखमी महिलेची Beed पोलिसात धाव

पीडित महिला काळेगाव इथली रहिवासी आहे. तिने केज पोलिसात यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे. आरोपींवर लवकरात लवकर कारवाई केली जावी, अशी मागणी तिने केली आहे. सदर प्रकरणी केज पोलीस तपास करत आहेत.

क्रूरतेचा कळस!! पारधी महिला घरासमोर फिरतेय म्हणून अंगावर सोडला कुत्रा, जखमी महिलेची Beed पोलिसात धाव
पारधी महिलेची केज पोलिसात तक्रारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 2:38 PM

बीड | 21 व्या शतकात एकिकडे जातीयता नष्ट करण्यासाठी मोठे प्रयत्न होत असताना तळागाळातील लोकांपर्यंत हे वारेही पोहोचले नसल्याचे चित्र दिसते. बीडमधील(Beed)  केज तालुक्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. पारधी महिलेला (Pardhi woman) एका कुटुंबाने अत्यंत क्रूर वागणून दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. केज तालुक्यातील हा प्रकार आहे. आदिवासी पारधी महिला आमच्या घरापुढून का जातेय, असे म्हणत सदर लोकांनी तिच्या अंगावर कुत्रे सोडल्याचा आरोप महिलेने केला आहे. या कुत्र्याने महिलेच्या पायाचे अक्षरशः लचके (Dog bite) तोडले. त्यामुळे तिला खोलवर जखमाही झाल्या आहेत. सदर प्रकारानंतर महिलेने थेट पोलिसात धाव घेत कुटुंबातील लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कुठे घडला प्रकार?

या महिलेने केलेले आरोप पाहता, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी गावात ही घटना घडली. महिलेने पोलिसात याविषयी तक्रार दाखल केली आहे. ती म्हणाली, सदर घरासमोरून मी जात होते. तेव्हा हे कुटुंब जेवायला बसले होते. मात्र आमच्या घरासमोरून का जातेय, असं म्हणत त्यांनी अंगावर कुत्रा सोडला, अशी तक्रार दिने केले. या कुत्र्याने महिलेच्या पायाला चावा घेतला. रवी गाताडे आणि अविनाश गाताडे अशी कुत्रा मालकांची नावे आहेत. तर जनाबाई काळे असं पीडित आदिवासी महिलेचे नाव आहे.

आरोपींवर कारवाई करण्याची मागणी

दरम्यान, पीडित महिला जनाबाई काळे यांना कुत्रा चावल्याने पायाला गंभीर जखम झाली आहे. या प्रकारानंतरही आरोपींना सदर महिलेच्या घरी जाऊन पोलिसात जाऊ नको, अशी धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. पीडित महिला काळेगाव इथली रहिवासी आहे. तिने केज पोलिसात यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे. आरोपींवर लवकरात लवकर कारवाई केली जावी, अशी मागणी तिने केली आहे. सदर प्रकरणी केज पोलीस तपास करत आहेत.

इतर बातम्या-

Nagpur Murders | नागपूर मार्चमध्ये रक्ताने माखले, महिनाभरात खुनाच्या 9 घटना; नातेवाईक, मित्रांनीच केला घात

Murder | हॉस्पिटलमध्ये अफेअर, 22 वर्षीय गर्लफ्रेण्डचा लग्नासाठी तगादा, प्रियकराने दिलं ‘मृत्यू’चं इंजेक्शन

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.