बीडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सरशी, जिल्ह्यात मनसेनेही खातं उघडलं, भाजपला मोठा झटका

ग्रामपंचायत निवडणुकीत बीड जिल्ह्यात भाजपला मोठा झटका बसला आहेत. कारण 129 ग्रामपंचायतींपैकी फक्त 32 ग्रामपंचायतींवर भाजपला विजय मिळाला आहे (Beed gram panchayat election result 2021).

बीडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सरशी, जिल्ह्यात मनसेनेही खातं उघडलं, भाजपला मोठा झटका
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 7:27 PM

बीड : महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 निवडणुकींचा निकाल आज समोर येत आहे. या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत विजय मिळताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनादेखील चांगलं बहुमत मिळताना दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत बीड जिल्ह्यात भाजपला मोठा झटका बसला आहेत. कारण 129 ग्रामपंचायतींपैकी फक्त 32 ग्रामपंचायतींवर भाजपला विजय मिळाला आहे (Beed gram panchayat election result 2021).

धनंजय मुंडे, कुंडलिक खांडे यांनी गड राखला, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांना हाबाडा

बीड जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली होती. त्याचा निकाल आज हाती आला. शिवसेनेला बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच तब्बल 31 ठिकाणी एकहाती विजय मिळालाय. परळीतून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तर बीडमधून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी या ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली. राष्ट्रवादीचे आमदार संदीप शिरसागर, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांना मात्र या निवडणुकीत हाबाडा मिळाला.

भाजपला मात्र या निवडणुकीत मोठा धक्का सहन करावा लागला. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपकडून कसलीही तयारी झाली नसल्याने त्याचा फटका भाजपला सहन करावा लागला. भाजपकडून पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावरही निवडणुकीची मदार होते. आष्टी वगळता भाजपला बीड जिल्ह्यातून फारसं यश मिळालं नाही. भाजप जिल्हाध्यक्ष निवड होऊन वर्ष उलटला. मात्र अद्याप तालुकास्तरावरील पदाधिकाऱ्यांची नेमणूक झालीच नसल्याने याचा मोठा फटका भाजपला या ग्रामपंचायत निवडणुकीत सहन करावा लागला. तर दुसरीकडे शिवसेनेने मरगळ झटकत पहिल्यांदाच बीड जिल्ह्यातून मोठे यश संपादीत आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी यांची बीड जिल्ह्यात सरशी झाल्याचे पहावयास मिळाले.

मनसेने खातं उघडलं

मनसेनं पहिल्यांदाच बीड जिल्ह्यातून ग्रामपंचायत निवडणुकीत खातं उघडलं आहे. केस तालुक्यातील नारेवाडी या ग्रामपंचायतीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत यांचं पॅनल एक हाती निवडून आले आहे. मनसेची ही जिल्ह्यातली एकमेव आणि पहिलीच ग्रामपंचायत आहे (Beed gram panchayat election result 2021).

बीड ग्रामपंचायत निवडणूक बलाबल:

राष्ट्रवादी- 39 शिवसेना- 31 भाजप- 32 मनसे- 01 मविआ- 04 स्था.आ- 22

हेही वाचा :

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | ‘भाजपचा सहा हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजयी होईल’, चंद्रकांत पाटलांचा दावा

Ahmednagar Gram Panchayat Election Results 2021: प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सत्ता गेली, बाळासाहेब थोरातांचा चंद्रकांत पाटलांना टोला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.