Dhananjay Munde on Mitkari : अमोल मिटकरींच्या ‘भार्या समर्पयामि’ वर भरभरुन दाद देणारे धनंजय मुंडे आता म्हणतात, तर ते खेदजनक !

अमोल मिटकरींबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ' जे वक्तव्य मिटकरी यांनी केलं ते त्या भाषणात एका लग्नाचा संदर्भ देत ते बोलले आहेत. याच्यातही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे

Dhananjay Munde on Mitkari : अमोल मिटकरींच्या 'भार्या समर्पयामि' वर भरभरुन दाद देणारे धनंजय मुंडे आता म्हणतात, तर ते खेदजनक !
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 4:36 PM

बीडः  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या हिंदू विवाहातील वादग्रस्त वक्तव्यावर भर सभेत खळखळून हसत दाद देणाऱ्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आता काहीशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखालल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) अशी भूमिका कदापि नाही. मिटकरी यांचं हे वक्तव्य वैयक्तिक असून मी याविषयावर त्यांना विनंती देखील केली आहे, असं वक्तव्य आता धनंजय मुंडे यांनी केलं आहे. ते वैयक्तिकरित्या याचं स्पष्टीकरण देतील असं आश्वासनही धनंजय मुंडेंनी दिलं आहे.

आधी हसले, आता सावध प्रतिक्रिया

सांगली येथील एका सभेत लग्नातील विधींतील श्लोक म्हणून दाखवताना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी जोशात आले आणि त्यांनी कन्यदान तसेच मम भार्या समर्पयामि या शब्दांवरून भलतंच वक्तव्य केलं. लग्नातील विधींबाबत असं भाष्य मिटकरींनी केलं तेव्हा सभेत एकच हशा पिकला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यावेळी लोट पोट हसून त्यांच्या या वक्तव्याला दिलखुलास दाद दिली. मात्र आता ब्राह्मण महासंघ तसेच अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी मिटकरींच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केल्यानंतर धनंजय मुंडेंनी याबाबत अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली.

आज काय म्हणाले धनंजय मुंडे?

अमोल मिटकरींबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ जे वक्तव्य मिटकरी यांनी केलं ते त्या भाषणात एका लग्नाचा संदर्भ देत ते बोलले आहेत. याच्यातही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे. मिटकरी यांचं व्यक्तिगत भाष्य होत. राष्ट्रवादी पार्टी म्हणून तो विषय बोलले नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितला होता. मी अमोल मिटकरी यांना आता बोललोय. मी त्यांना विनंती देखील केलीय. बघुयात ते काय करतात. मला असं वाटतं कुठल्याही समाजाचा कुठल्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. जात पात धर्म हे आमच्या अंगाला देखील शिवलं नाही. आम्ही त्याच संदर्भात हसत होतो. असा संदर्भ कुठेही येत नाही. ते जे बोलले ते वयक्तिक बोलले. मिटकरी स्वतः स्पष्टीकरण देतील.

पहा अमोल मिटकरी यांचं ते वक्तव्य…

इतर बातम्या-

 शासनाकडून ओबीसींना फसवण्याचं कारस्थान; सरकारचा अहवाल थातूरमाथूर; प्रकाश आंबेडकरांची टीका

NCP Amol Mitkari : राष्ट्रवादीत चाललंय काय? अमोल मिटकरींच्या ज्या वक्तव्याला जयंत पाटील, धनंजय मुंडेंची दिलखुलास दाद, त्यावर राष्ट्रवादीचाच नेता म्हणतो, माफी माग

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.