Video | Dog vs Monkey | अखेर ‘ते’ वात्रट वानर जेरबंद! वानरानं पळवलेली तब्बल 40 ते50 कुत्र्याची पिल्लं

वानराला जेरबंद केल्यानं अखेर गावातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. लऊळ गावातील कुत्र्याची पिल्ल पळवणारी वानरं जेरबंद झाल्यानं श्वानप्रेमींनाही दिलासा व्यक्त केलाय.

Video | Dog vs Monkey | अखेर 'ते' वात्रट वानर जेरबंद! वानरानं पळवलेली तब्बल 40 ते50 कुत्र्याची पिल्लं
कुत्र्याची पिल्लं पळवणारं वानर
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 11:34 AM

बीड : गेल्या काही दिवसांपासन बीड (Beed) जिल्ह्यातील लऊळ हे गाव संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू बनला होता. दोन वानरांनी घातलेल्या धुमाकुळानं गावातील लोकं त्रस्त झाले होते. अखेर दहशत माजवणाऱ्या या वानराला जेरबंद करण्यात आलं आहे. वनविभागानं सापळा रचून या वानराला जेरबंद केलंय. गेल्या 4 महिन्यांपासून वानरानं (Monkey) लऊळ गावानं अक्षरशः धुमाकळ घातला होता. विशेष म्हणजे तब्बल 40 ते 50 कुत्र्याची पिल्लांना उचलून नेलं होतं. रानटी वानरांनी कुत्र्यांच्या पिल्लांना आधी गोंजरण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर या कुत्र्यांच्या पिल्लांना घेऊन ही वानरं इमारतीच्या छतावर घेऊन जायते. तिथं त्यांना काही खाणं-पिणं मिळत नसल्यानं 40 ते 50 कुत्र्यांचा (Dogs) मृत्यूही झाल्याची बाब समोर आली होती.

फोटोत दिसणारं वानराच्या कुत्र्यातील पिल्लू पाहून कदाचित आश्चर्य वाटेल. पण माजलगाव तालुक्यातील लऊळ गावात गेले चार महिने वात्रट वानरं कुत्र्यांच्या पिल्लांना आधी कुरवाळून नंतर त्यांना इमारतीच्या छतावर घेऊन जात होती. खायला काहीच मिळत नसल्यानं या पिल्लांचा भूकबळीनं जीव गेल्याचं स्थानिक ग्रामस्थ दत्तात्रय मोरे यांनी सांगितलंय. नागरीकांच्या भीतीपोटी वानरं कुत्र्यांना इमारतीच्या छतावरच ठेवून देत होती.

पाहा व्हिडीओ –

लऊळ गावात बाळासाहेब भगत यांची एक इमारत आहे. या इमारतीवर कोणालाही जाता येत नाही. यायच फायदा उचलून वानरांनी कुत्र्याच्या पिल्लांना याच इमारतीवर ठेवलं होतं. भगत कुटुंबाकडून या पिलांना अधून मधून अन्न आणि पाणी पुरविले जात होतं. मात्र मानवी वस्तीचा वावर असल्याचं लक्षात येताच वानर कुत्र्याच्या पिलांना दुसरीकडे उचलून घेऊ जायचे, अशी माहिती बाळासाहेब भगत यांनी दिली आहे. दुसरीकडे पळवून नेल्यानंवर कुत्र्यांच्या इवल्याशा पिल्लांना खाणला काहीच मिळत नव्हतं. अशा अवस्थेत भूकबळीमुळे 40 ते 50 पिल्लं दगावली असल्याचं सांगितलं जातंय.

पाहा व्हिडीओ –

सुटकेचा निश्वास

बाळासाहेब भगत यांच्या इमारतींवर पत्रे आहेत. वानर जेव्हा कुत्र्यांच्या पिलांना आणून सोडायचं, तेव्हा पत्र्यांवर मोठा आवाज व्हायचा. त्यामुळे ग्रामस्थही भयंकर त्रासले होते. वनविभागाने या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी वारंवार करत होते. अखेर सापळा रचून वनविभागानं या वानराला जेरबंद केलंय. मात्र ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन प्राणीमित्रांनी केलंय. ही वानरं पिसाळलेली नाही. त्यांच्यापासून कोणताही थेट धोका नाही, असं प्राणीमित्र सिद्धार्थ सोनावणे यांनी म्हटलंय.

दरम्यान, वानराला जेरबंद केल्यानं अखेर गावातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. लऊळ गावातील कुत्र्याची पिल्ल पळवणारी वानरं जेरबंद झाल्यानं श्वानप्रेमींनाही दिलासा मिळालाय.

इतर बातम्या – 

CNG, PNG च्या दरात पुन्हा वाढ; ग्राहकांना मोठा आर्थिक फटका, वर्षभरात 16 वेळेस वाढले भाव

छोट्या बचत योजनांमधील गुंतवणूक झाली कमी, डिमॅट खात्यांमध्ये दुपटीने वाढ; काय आहेत कारणे?

1 जानेवारीपासून तुमच्या खिश्याला एटीएमची झळ ! एटीएममधून पैसे काढणे होणार महाग, जाणून घ्या प्रत्येक व्यवहाराला किती मोजावे लागेल शुल्क

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.