अंबा साखर कारखाना पवारांच्या घशात घालण्याचा डाव, माजी आमदार माणिक जाधव यांचा आरोप

बीडः  मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचा म्हणून अंबा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. याच अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्याने यापूर्वी साखर कारखान्याचे 25 एकर जमीन विकली आहे आणि आता पंधरा वर्षासाठी हा साखर कारखाना खासगी कंपनीला चालवण्यासाठी देऊन हा साखर कारखाना पवारांच्या (Sharad Pawar) घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप कामगार नेते आणि माजी आमदार माणिकराव जाधव […]

अंबा साखर कारखाना पवारांच्या घशात घालण्याचा डाव, माजी आमदार माणिक जाधव यांचा आरोप
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 12:41 PM

बीडः  मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचा म्हणून अंबा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. याच अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्याने यापूर्वी साखर कारखान्याचे 25 एकर जमीन विकली आहे आणि आता पंधरा वर्षासाठी हा साखर कारखाना खासगी कंपनीला चालवण्यासाठी देऊन हा साखर कारखाना पवारांच्या (Sharad Pawar) घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप कामगार नेते आणि माजी आमदार माणिकराव जाधव (Manikrao Jadhav) यांनी केला आहे. ते अंबा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आयोजित ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या बैठकीत बोलत होते.

शेतकरी, कामगारांच्या बैठकीत काय चर्चा?

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या थकीत पैशा संदर्भात व अंबासाखर कारखाना विनाविलंब चालू झाला पाहिजे आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. 4 महिन्यांपासून शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर येथील कारखाना प्रशासनाने व संचालक मंडळाने कुठलीही दखल न घेतल्याने शेतकरी व कामगार आक्रमक झाले आहेत. अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या चालू होत असलेल्या गळीत हंगामात कुठलाही प्रकारचा अडथळा न येऊ देता तो कारखाना सुरळीत चालला पाहिजे. तसेच तो कारखाना विद्यमान संचालक मंडळानेच सक्षम पद्धतीने चालवला पाहिजे, कोणत्याही खाजगी एजन्सीला अथवा त्रयस्थ व्यक्तीला कारखाना भाड्याने अथवा विक्री करून चालवायला देऊ नये, विद्यमान संचालक मंडळाला कारखाना चालू करण्यास काही अडचणी असतील तर आम्ही त्यास सर्वतोपरी मदत करू असा विश्वास माजी आमदार माणिक राव जाधव यांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या-

PM Security Breach: पंजाब पोलिसांकडून गुप्तचर विभागाच्या माहितीकडे दुर्लक्ष, ब्ल्यू बुक नियमांकडे कानाडोळा; केंद्रीय गृहमंत्रालयाने ठेवलं बोट

PM Security Breach: पंजाबचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिवांना निलंबित करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.