बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची दुटप्पी भूमिका, मंजूर कामात घातला खोडा; शिवसेनेचा आरोप
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यासाठी अनेक कामं मंजूर केली आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली काम अधिकतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना देण्यात आली आहेत.
बीड – महाविकास आघाडीचं सरकार जास्त काळ टिकणार नसून ते मध्येच कोलमडेलं अशी वक्तव्यं वारंवार विरोधी पक्षांकडून महाराष्ट्रात (maharashtra)केली जातात. त्यामागे अनेक कारणे कारण तीन पक्ष एका सत्तेत नांदू शकत नाही असं विरोधकांना वाटतंय. विरोधकांच्या म्हणण्यानुसार बीड (beed)मधील एक प्रकरण सद्या बाहेर आल्याचं पाहायला मिळतंय. बीडच्या माजी शिवसेना जिल्हाप्रमुखाने ही बाब उघडकीस आणली आहे. सद्याचे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर (sandeep kshirsagar) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुर केलेल्या कामांमध्ये खोडा घालत असल्याचा आरोपमाजी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केला आहे. त्यामुळे राज्य सरकारला एक प्रकारे घरचा आहेर मिळाला असल्याची बीडमध्ये राजकीय चर्चा आहे. त्यामुळे सोमवारी अजित पवार यांच्या बीड दौ-याच्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवणार असल्याचे शिवसैनिकांकडून जाहीर करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरणं
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यासाठी अनेक कामं मंजूर केली आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली काम अधिकतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना देण्यात आली आहेत. सध्या बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत. तिथं काम करण्यावरून अनेक दिवसांपासून वाद आहे, परंतु राष्ट्रवादीचे आमदारा संदीप क्षीरसागर हे आणि त्यांचे कार्यकर्ते मंजूर कामात अडथळा निर्माण करत असून आम्हाला काम करू देत नसल्याचा आरोप बीडचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केला आहे. एका पुलाच्या कामासाठी उद्धव ठाकरे यांनी चार कोटीची कामे मंजूर केली होती. तिथं प्रत्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी खोडा घातल्याने शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
संतप्त शिवसैनिक अजित पवारांना काळे झेंडे दाखवणार
बीडमध्ये अनेक कामांमध्ये राष्ट्रवादीरकडून होणारा अडथळा सहन होत नसल्याने नेमकं सांगायचं कुणाला असं अशा विचारात शिवसैनिक आहेत. कारण महाराष्ट्रात सध्या आघाडी सरकार असल्याने तिघांनाही कामाचं समान वाटप असायला हवं असं काही शिवसैनिकांना वाटतंय. बीडच्या माजी शिवसेना जिल्हाप्रमुखाने महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे अशी चर्चा बीडच्या विरोधकांमध्ये आहे. आपसातला वाद मिटणार की हे प्रकरण असचं चिघळत राहील हे आपल्याला समजतंच राहिल. परंतु उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. त्यावेळी त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवून या प्रकरणाचा निषेध नोंदवणार असल्याचे शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे.