AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा माझं भाग्य की, तुमचा संघर्षाचा वारसा मला मिळाला; गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीदिनी पंकजा भावूक

Pankaja Munde Post About Gopinath Munde Death Anniversary : बाबा, तुम्ही आमच्या श्वासाश्वासात आहात; गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी, पंकजा मुंडे यांच्याकडून आठवणींना उजाळा

बाबा माझं भाग्य की, तुमचा संघर्षाचा वारसा मला मिळाला; गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीदिनी पंकजा भावूक
| Updated on: Jun 03, 2023 | 11:07 AM
Share

बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज 9 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बाबा, आमच्या श्वासाश्वासात तुम्ही आहात, असं पंकजा मुंडे या व्हीडिओमध्ये म्हणाल्या आहेत.

श्वास चालू असेल तर माणूस जिवंत आहे, असं म्हणतात. पण श्वास थांबल्यानंतर देखील लोकांच्या आठवणीत राहाणं हे लोकांचं प्रेम आहे. आता नऊ वर्षे होईन गेली तरी प्रत्येकाला तुमचे लोकनेते आणि माझे बाबा गोपीनाथराव मुंडेसाहेब. आज त्यांना जाईन नऊ वर्षे झाली तरी आपल्याला त्यांची पदोपदी आठवण येते ही किती मोठी पुण्याई आहे. माझं भाग्य आहे की माझा जन्म त्यांच्या पोटी झाला. त्याहूनही मला माझं भाग्य वाटतं ते म्हणजे त्यांच्या संघर्षाचा वारसा मला मिळाला. स्वाभिमानाने संघर्ष करत मुंडेसाहेब लढले. तसंच मीदेखील लढत राहील हे मी माझं कर्तव्य समजते. तेमी शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करत राहील, असं पंकजा मुंडे या व्हीडिओमध्ये म्हणाल्या आहे.

आठवण साहेबांची !!, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे.

देशाच्या पंतप्रधानांपासून ते तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत, कोणत्याही पक्षाच्या नेत्याने गोपीनाथराव मुंडे यांची आठवण काढली नाही, असं झालं नाही. त्यांच्या आठवणी सांगणाऱ्या लोकांना ऐकलं की बळ मिळतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

पंकजा मुंडे यांनी शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे पी नड्डा यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांच्याही प्रतिक्रिया आहेत.

भव्य जनसागर हा गोपीनाथराव मुंडे यांच्या तपस्येचं फळ आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. तर भाजपच्या यशात गोपीनाथ मुंडे यांचं मोठं योगदान आहे, असं अमित शाह म्हणालेत.

गोपीनाथराव मुंडे असते तर माझे अडीच वर्षे जेलमध्ये गेले नसते. पहाडासारखा हा माझा भाऊ माझ्या पाठीशी उभा राहिला असता, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी छगन भुजबळ गहिवरल्याचं पाहायला मिळालं.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.