Beed : 22 वर्षीय विवाहितेवर दोघा नराधमांचा बलात्कार! सामूहिक बलात्कारच्या घटनेनं बीड पुन्हा हादरलं

याबद्दल कुणाला सांगितलं, तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकीही पीडितेला देण्यात आली होती.

Beed : 22 वर्षीय विवाहितेवर दोघा नराधमांचा बलात्कार! सामूहिक बलात्कारच्या घटनेनं बीड पुन्हा हादरलं
बीडमधील खळबळजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 3:23 PM

बीड : बीड जिल्ह्यातून (Beed crime) धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षांच्या विवाहीत महिलेवर बलात्कार करण्यात आला. दोघा नराधमांनी बलात्कार (Gang rape case) केल्याचा खळबळजनक घटना समोर आल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जातो आहे. या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं बीड जिल्हा हादरुन गेला आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात (Parali crime) ही घटना घडली. शेतात काम करणाऱ्या एका 22 वर्षांच्या विवाहितेवर दोघांनी अतिप्रसंग केलाय. बलात्कार करुन दोघांनी या महिलेला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. ही महिला एकटी असल्याचा गैरफायदा दोघांनी तिच्यावर बलात्कार केलाय. या संतापजनक घटनेनं भयभीत झालेल्या पीडितेचं कसंबसं पोलीस स्थानक गाठलं आणि आपल्यासोबत घडलेला सगळा प्रसंग सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन घेत सामूहिक बलात्कारप्रकरणातील नराधमांना अटकही केली आहे. पोलीस अधिक्षक मारुती मुंडे यांनी याप्रकरणी अधिक माहिती दिली आहे.

संतापजनक घटना

मिरवट गावातील 22 वर्षांची पीडीत महिला ही शेतात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. बुधवारी पीडित महिला आपल्या घरालगतच्या शेतात काम करत होती. यादरम्यान अंगद केशव भदाडे आणि साजन तिडके या नराधम आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तर याबद्दल कुणाला सांगितलं, तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकी दिली.

दोघांना अटक

याप्रकरणी 22 वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधम आरोपिंविरोधात 376 (ड), 323, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या 3 तासात नराधम आरोपींना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय.

दरम्यान गेल्या 4 दिवसांपूर्वीच बीडच्या बेलूरा गावातील 24 वर्षीय विवाहितेवर, चुलत पुतण्यासह गावातीलच चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता परळीच्या मिरवट गावात पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने, बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.