Beed : वडिलांना वाचवण्यासाठी तरुणाची उडी! परळीत बापलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू

सादिक शेख आणि रफिक शेख असं मृत्यू झालेल्या बापलेकाचे नाव आहे.

Beed : वडिलांना वाचवण्यासाठी तरुणाची उडी! परळीत बापलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू
दुर्दैवी घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 7:49 AM

बीड : वडिलांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या तरुणासह त्याच्या वडिलांचाही मृत्यू (Father And son Died) झालाय. बीड जिल्ह्यातील (Beed News) परळी तालुक्यात ही घटना घडली आहे. परळी तालुक्यातील वडगाव इथं वडील आणि मुलगा फिरण्यासाठी गेले होते. यावेळी विहिरीतून पाणी काढताना वडिलांचा पाय घसरला. पाय घसरुन वडील विहिरीत पडले. हे पाहून मुलानं लगेचच वडिलांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मुलानंही विहिरीत उडी घेतली. मात्र वडिलांना वाचवण्यात मुलाला यश आलं नाही. दुर्दैवानं मुलगा आणि त्याचे वडील दोघेही पाण्याची गुदमरले गेले (Beed Drown) आणि बुडून त्या दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, यानंतर दुसरा मुलागाही पाण्यात बुडत असलेल्या भाऊ आणि वडीलांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरला. पण त्याला यश आलं नाही. अखेर आईनं दोर टाकून त्याला वाचवलं. मात्र या घटनेत पती आणि मुलाला वाचवण्यात न आल्यानं एकच आक्रोश पाहायला मिळाला.

परळीत नेमकं कुठं घडलं?

परळीतील दादाहरी वडगाव इथल्या विहिरीत बुडून बाप लेकाचा मृत्यू झाला. सादिक शेख आणि रफिक शेख असं मृत्यू झालेल्या बापलेकाचे नाव आहे. सादिक शेख हे नातेवाईकांसोबत दादाहरी वडगाव येथे फिरण्यासाठी गेले होते.

दादहरी वडगाव इथं फिरण्यासाठी गेले असता विहिरीवरून पाणी काढत असताना पाय घसरून सादिक विहिरीत पडले, त्यांना वाचवण्यासाठी 25 वर्षीय मुलगा रफिक यांनेही विहिरीत उडी घेतली. मात्र दोघेही पाण्यात बुडाले.

हे सुद्धा वाचा

पती आणि मुलाला गमावलं

भाऊ आणि वडील विहिरीत बुडत असल्याचं लक्षात आल्यानंतर सादिक यांच्या दुसऱ्या मुलानंही त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. साजिदही विहिरीत त्यांना वाचवण्यासाठी उतरला. मात्र तो देखील बुडायला लागला. अखेर त्याच्या आईने दोर टाकून त्याला वाचवलं. मात्र या घटनेत पती आणि मुलाला वाचवण्यात त्यांना अपयश आले. या घटनेनं शेख कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातही हळहळ व्यक्त केली जातेय.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.