Beed Election: बीड जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी, मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला

बीड जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीतील मंत्री धनंजय मुंडे या भावंडांत खरी लढत होणार आहे.

Beed Election: बीड जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी, मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 12:17 PM

बीडः मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असतं. बीडमध्येही सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने यासाठी मोर्चेबांधणीही सुरु केली आहे. तसेच महाविकास आघाडीतर्फेही कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. बीड जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांमधील थेट निवडणूक मानली जाते, आता जिल्हा परिषद निवडणुकीकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात

जिल्हा परिषद निवडणुकी साठी भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय. मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात भटके विमुक्तांची संख्या मोठी आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीसह महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपकडून मोठे पाऊल उचलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने भटके विमुक्त आघाडी युवा मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षपदी सतीश भोसले यांची निवड करण्यात आलीय. सतीश भोसले यांच्या निवडीमुळे भाजपचे पारडे जड झाले असून त्यांच्या निवडीचे बीड जिल्ह्यातून स्वागत होत आहे.

मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला..

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीतील मंत्री धनंजय मुंडे या भावंडांत खरी लढत होणार आहे. 2015-16 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने जिल्हा परिषदेवर झेंडा रोवला होता. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाले आणि जिल्हा परिषद महाविकास आघाडी म्हणजे धनंजय मुंडेंच्या ताब्यात आली. आता दोन्हीही भावंडांचे लक्ष जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे.

सर्वपक्षीय नेत्यांची तयारी सुरु

मिनी विधानसभा म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद ताब्यात आल्यानंतर विधानसभा निवडणुका लढण्यास सहज होते. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांकडून मोठी ताकत लावली जातेय. येत्या फेब्रुवारी मध्ये जिल्हा परिषद निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. त्याआधीच बीडमध्ये भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आलीय.

इतर बातम्या-

PDCC Bank |पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जातीवाद, मतदानानंतर काय म्हणाले अजित पवार?

औरंगाबाद महिला काँग्रेसमध्ये बदल, नवनियुक्त अध्यक्षांवर पदाधिकाऱ्यांची नाराजी, मुंबईला जाणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.