बीडच्या नावावर पुन्हा कलंक! मुलींचा जन्मदर घटला, पाटोदा, केज आणि पंकजा मुंडेंच्या परळीतही धक्कादायक आकडेवारी!

मुलींचा जन्मदराबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर बीड आणि लातूर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ज्या तालुक्यांमध्ये सर्वात कमी जन्मदर आहे, त्या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात होत असल्याचा संशय बळावला आहे. अशा सेंटर्सची माहिती देणाऱ्यावर प्रशासनाने लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

बीडच्या नावावर पुन्हा कलंक! मुलींचा जन्मदर घटला, पाटोदा, केज आणि पंकजा मुंडेंच्या परळीतही धक्कादायक आकडेवारी!
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 3:00 AM

बीडः स्त्री भ्रूण हत्या प्रकरणात बीड (Beed District) जिल्ह्याचे नाव देशात गाजले होते. आता पुन्हा एकदा याच जिल्ह्यात मुलींच्या जन्माचा दर अत्यंत कमी आल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. कोव्हिड काळात (Covid-19) मुलींच्या जन्मदरात (Girl Child Ratio) मोठी घट झाल्याचे समोर आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात हजार मुलांमागे केवळ 764 मुलींचा जन्म झाला आहे. कोव्हिड काळात पालकांनी मुलाच्या जन्माचा अट्टाहास केल्याने ही भयानक स्थिती उद्भवली असल्याचे PCPNDT च्या अशासकीय सदस्या डॉ आशा मिरगे यांनी सांगितले आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हे भीषण सत्य व्यक्त केले आहे. 2011 मध्ये स्री भ्रूण हत्यांचे प्रकरण टीव्ही 9 ने चव्हाट्यावर आणले होते. त्यांनंतर राज्यात नव्हे तर देशात खळबळ उडाली होती. आता कोरोना संकटानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील मुलींचा धक्कादायक असा जन्मदर समोर आला आहे.

पाटोदा, केज आणि परळीत भीषण स्थिती

बीड जिल्ह्यातील एकूण मुलांमागील मुली जन्मण्याचा सरासरी दर 764 असला तरीही जिल्ह्यातील काही तालुक्यांतील आकडेवारी आणखीच धक्कादायक आहे. जिल्ह्यातील केज, पाटोदा आणि परळीतील मुलींचा जन्मदर खूप खालावला आहे. यापैकी पाटोदा तालुक्यात 1 हजार मुलांमागे फक्त 764 मुली जन्मल्या आहेत. तर त्यापाठोपाठ केजमध्ये 888 तर त्यानंतर परळीत 903 मुली जन्मल्या. भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांचं खंबीर नेतृत्व लाभलेल्या परळी मतदारसंघातही अशी स्थिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अज्ञान आणि अवैधरित्या गर्भपात केंद्र सुरु असल्यानं अशी स्थिती समोर आली असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. 2021 मधील बीडमधील तालुकानिहाय मुलींच्या जन्मदराची आकडेवारी पुढील प्रमाणे-

अंबाजोगाई- 951 आष्टी- 1003 बीड- 954 धारूर- 1040 गेवराई- 905 केज- 888 माजलगाव- 929 परळी- 903 पाटोदा- 764 शिरुर कासार- 848 वडवणी- 1104

मागील दहा वर्षातील स्थिती काय?

– 2010-11 मध्ये 800 2011-12 मध्ये 979 2012-13मध्ये 893 2013-14 मध्ये 916 2014-15- मध्ये 913 2015-16 मध्ये 898 2016-17 मध्ये 927 2017-18 मध्ये 996 2018-19 मध्ये 961 2019-20 मध्ये 947 2020-21मध्ये 928

लातूर जिल्ह्याची स्थिती काय?

लातूर जिल्ह्यातल्या दहा पैकी पाच जिल्ह्यांमध्ये मुलांच्या प्रमाणात मुलींचा जन्मदर कमी असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या पर्यवेक्षक मंडळाने दिली आहे . लातूर परिमंडळात असलेल्या देवणी मध्ये एक हजार मुलांमागे 771 मुलींचा जन्मदर आहे . तर औसा तालुक्यात 810, शिरूरअनंतपाळ-836 ,निलंगा 849 ,जळकोट 834 असा जन्म दर आहे . या संख्येला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत .

अवैध सेंटर्सची माहिती सांगणाऱ्याला लाखांचे बक्षीस

दरम्यान, मुलींचा जन्मदराबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर बीड आणि लातूर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ज्या तालुक्यांमध्ये सर्वात कमी जन्मदर आहे, त्या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात होत असल्याचा संशय बळावला आहे. अशा सेंटर्सची माहिती देणाऱ्यावर प्रशासनाने लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

इतर बातम्या-

IPL 2022: शाहिन आफ्रिदीला IPL मध्ये 200 कोटी मिळाले असते, पाकिस्तानी पत्रकाराच्या मूर्खपणावर तुटून पडले नेटीझन्स

Sanjay Raut Vs Bjp : राणे म्हणाले राऊत राष्ट्रवादीचे, तर राऊतही म्हणाले होय मी राष्ट्रवादी !

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.