“तगडी फाईट होईल असा उमेदवार मिळाला तर आनंदच”; भाजपच्या उमेदवाराने आताच शड्डू ठोकला

प्रीतम मुंडे यांनी आपल्या कामाविषयी विश्वास व्यक्त करताना सांगितले की, मी माझं काम गेली नऊ वर्षे करत आहे. त्यामुळे आता माझ्या कामामुळे माझ्या समोरच्या उमेदवाराला धडकी भरणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

तगडी फाईट होईल असा उमेदवार मिळाला तर आनंदच; भाजपच्या उमेदवाराने आताच शड्डू ठोकला
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 6:30 PM

बीड : बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच आता आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांवरूनही प्रत्येक पक्षाचे राजकारण तापले आहे. आगामी काळातील निवडणुकांचे वेळापत्रक अजून जाहीर झाले नसले आता पासूनच प्रत्येक राजकीय पक्षाकडून चाचपणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे बीडमधील राजकारण आणखी ढवळून निघाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी विश्वास व्यक्त करत, आगामी काळातील निवडणुकीही आता आपणच जिंकणार असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अजून उमेदवार मिळाला नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी प्रीतम मुंडे म्हणाल्या की, मी काम करते का नाही याचा लेखाजोखा जनता देईल. मात्र विरोधी उमेदवार चांगला असावा त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

राष्ट्रवादीला अजून उमेदवार निश्चित करता आला नाही. त्यामुळे लोकसभेची निवडणूक अर्धी आपण जिंकलेली आहे असा थेट इशाराच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.

तगडी फाईट होईल असा उमेदवार मिळाला तर मला आनंद वाटेल पण मला आनंद वाटत नाही. त्यांना पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी समोर लढवायच ठरवलं तर काही नाही. मात्र आम्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत राहिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तर खासदार प्रीतम मुंडे यांनी दिल्ली महिला खेळाडू प्रकरणावर बोलताना सांगितले की, महिला खेळाडूंची तक्रार आल्यास दखल घेतली गेली पाहिजे. दखल घेतली जात नसेल तर लोकशाहीमध्ये ही घटना स्वागतार्ह नाही. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई ही झालीच पाहिजे असं त्यांनी आपल्याच पक्षाला त्यांनी घरचा आहेर दिला आहे.

परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा दर्जा गेला आहे असं ज्यांनीसांगितलं आहे. त्याचा अर्थ या आधी दर्जा होता, त्या गोष्टीचे कागदपत्रे असतील या प्रकारचा ज्यांनी असे दावे केलेले असतील त्यांनी त्याचे पुरावे सादर करावे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

दुर्दैवाने हा वाद एकट्या परळी ज्योतिर्लिंगाचा नाही अनेक ज्योतिर्लिंग विषयी संभ्रम आहेत. केंद्राच्या यादीत यावं म्हणून मी प्रयत्न करीत आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट करावे.

केंद्र आणि राज्य सरकारविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, नऊ वर्षात सरकारचा लेखाजोखा सकारात्मक आहे. तळागाळात जाऊन आम्ही संवाद साधला आहे, त्या प्रकारची कामं केली आहेत. त्यामुले ही नऊ वर्षे नवचैतन्यचे गेले असंही त्यांनी यावेळी सांगितले.

तर प्रीतम मुंडे यांनी आपल्या कामाविषयी विश्वास व्यक्त करताना सांगितले की, मी माझं काम गेली नऊ वर्षे करत आहे. त्यामुळे आता माझ्या कामामुळे माझ्या समोरच्या उमेदवाराला धडकी भरणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे अनेक खाती आहेत. दोन जिल्ह्यात काम करावे लागत असल्याने त्यांचे दुर्लक्ष होते आहे. ते पैसे मागतायेत याचा काही आधार असेल तर आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, आज बाबा असते तर राज्यातील राजकारण वेगळे असते. आम्ही लहान असताना राजकारणात जो चाम होता तो आता हरविलेला आहे अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.