बीडमध्ये थंडीचा कडाका वाढला, थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार
वातावरणामध्ये बदल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. हवेत गारठा वाढल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातून जवळपास थंडी गायबच झाली होती.

बीड : वातावरणामध्ये बदल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. हवेत गारठा वाढल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातून जवळपास थंडी गायबच झाली होती. मात्र आता वातावरणात बद झाल्याने थंडीची लाट आली आहे. जिल्ह्यातील किमान तापमानात देखील घट झाली आहे. शहरी भागातील नागरिक या गुलाब थंडीमध्ये मॉर्निंग वॉकचा आनंद घेताना दिसून येत आहेत.
थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार
दरम्यान दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये थंडी अधिक असल्याने नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात पुढील आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक जण थंडीत घराबाहेर पडणे देखील टाळत आहेत.
पिकांना पोषक वातावरण
वातावरणात गारवा निर्माण झाल्याने पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या थंडीचा फायदा हा गहू हरभारा या सारख्या पिकांना होताना दिसून येत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये भितीचे वातावर होते. मात्र आता वातावर कोरडे झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
संबंधित बातम्या
काय सांगता ! 3,682.84 कोटींचे व्यवहार झाले डिजिटल, तीन वर्षांत डिजिटल व्यवहार जवळपास दुप्पट