धनंजय मुंडे यांची तब्येत बिघडल्याने ; पुढील सर्व नियोजित दौरे रद्द; राष्ट्रवादी आपल्या दारी राज्यभर अभियान

सध्या त्यांच्यावर परळी इथल्या राहत्या घरी उपचार सुरू आहेत. काल त्यांनी राष्ट्रवादी आपल्या दारी या अभियानात सहभाग घेतला होता. यावेळी जास्त धावपळ झाल्याने त्यांची तब्येत बरी नसल्याचे सांगण्यात आले.

धनंजय मुंडे यांची तब्येत बिघडल्याने ; पुढील सर्व नियोजित दौरे रद्द;  राष्ट्रवादी आपल्या दारी राज्यभर अभियान
धनंजय मुंडे यांची तब्बेत बिघडलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 5:35 PM

परळी: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde) यांची तब्येत बरी नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा परभणी दौरा रद्द (Parbhani Tour Cancel) करण्यात आला आहे. रात्रीपासूनच त्यांना ताप आणि पोटात दुखत असल्याने त्यांचे पुढील नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर परळी (Parali) इथल्या राहत्या घरी उपचार सुरू आहेत. काल त्यांनी राष्ट्रवादी आपल्या दारी या अभियानात सहभाग घेतला होता. यावेळी जास्त धावपळ झाल्याने त्यांची तब्येत बरी नसल्याचे सांगण्यात आले.

धनंजय मुंडे यांना एप्रिल महिन्यातही अचानक मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जात होते, मात्र त्यानंतर त्यांच्या तपासण्या झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

अचानक पोटात दुखू लागले

त्यानंतर आता परळी दौऱ्यावर असतानाच त्यांना अचानक पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करुन त्यांना विश्रांती घेण्याची सूचना डॉक्टरांनी दिली आहे.

 राष्ट्रवादी आपल्या दारी अभियान सुरू

राष्ट्रवादी पक्षाकडून सध्या राष्ट्रवादी आपल्या दारी हे अभियान सुरू आहे, त्यामध्ये अनेक नेत्यांचा सहभाग आहे, मात्र या अभियानामध्ये धनंजय मुंडे यांची महत्वाची भूमिका असल्याने त्यांनी एक सलग दौरे सुरू केले आहेत. त्यामुळे आताही ते दौऱ्यावर असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले.

पोटदुखीचा त्रास

काल रात्री पासून त्यांना ताप आणि पोटात दुखू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एप्रिल महिन्यातही त्यांना अचानक त्रास सुरू झाल्यानंतर मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आताही त्यांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना तात्काळ तेथीलच रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या तपासण्या केल्यानंतर त्यांच्या दौऱ्यामुळे आणि त्रासामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या त्यांच्या घरीच उपचार सुरू असून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.