शेतातील कचरा पेटवण्यासाठी शेतकरी गेला, तिथं झालेल्या स्फोटात तीन जण होरपळले

एक शेतकरी कचरा जाळण्यासाठी शेतावर गेला. कचरा जाळल्यानंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटात त्याचा मृत्यू झाला, तर दुसरे दोन जण जखमी झाले.

शेतातील कचरा पेटवण्यासाठी शेतकरी गेला, तिथं झालेल्या स्फोटात तीन जण होरपळले
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 3:01 PM

बीड : जूनच्या दुसऱ्या आठवड्या मान्सून येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आतापासून शेतकरी कामाला लागला आहे. शेतात खत टाकण्याचे काम सुरू आहे. शिवाय जुना काही माल असेल तर तो जाळला जातो. शेतीची पूर्वमशागत करण्याचे काम सुरू आहे. यासाठी शेतकरी शेतावर जातात. शेतातील काही कचरा जाळला जातो. असाच एक शेतकरी कचरा जाळण्यासाठी शेतावर गेला. कचरा जाळल्यानंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटात त्याचा मृत्यू झाला, तर दुसरे दोन जण जखमी झाले.

जिलेटीन कांड्यांचा भीषण स्फोट

विहिरी खोदण्यासाठी मुलाने शेतात जिलेटीनच्या कांड्या आणून ठेवल्या होत्या. मात्र या कांड्याची माहिती शेतकरी वडिलांना नव्हती. खरीप पेरणीच्या तोंडावर शेतातील काडी कचरा काढण्यासाठी पित्याने आज सकाळी बांध पेटविला. याच आगीत जिलेटीन कांड्याचा भीषण स्फोट झाला.

beed 2 n

हे सुद्धा वाचा

या स्फोटात आप्पासाहेब सोपानराव मस्के या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. तर दोन जण जखमी झाले आहेत. घटना बीडच्या राक्षसभुवन इथली आहे. घटनेनंतर आरोग्य विभाग आणि पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

समन्वय नसल्याने घडला प्रकार

मुलाचे शेतात काय ठेवले याची कल्पना दिली असती, तर आप्पासाहेब यांचा जीव गेला नसता. घरात समन्वय नसल्याने हा प्रकार घडला. मुलाला आता या गोष्टीचं दुःख होत आहे. आपण वडिलांना कल्पना दिली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती. पण, वेळ निघून गेल्यावर दुःख व्यक्त करण्यापलीकडं काही हातात नसते.

शेतात विहीर खोदायची होती. त्यासाठी मुलाने जिलेटनच्या कांड्या आणल्या होत्या. त्यांचा स्फोट करून विहीर खोदायची होती. परंतु, याची कल्पना वडील आप्पासाहेब मस्के यांना नव्हती. त्यामुळे त्यांनी शेतातील कचरा पेटवण्यासाठी आग लावली. या आगीत मोठा स्फोट झाला. या स्फोटात वडिलांचा मृत्यू झाला, तर आणखी दोन जण जखमी झाले.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.