Beed Firing : बीडमध्ये हळदी समारंभात नवरदेवाचा मित्रांसह धिंगाणा; उत्साही नवरदेवाचा हवेत गोळीबार
लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवाने उत्साहाच्या भरात थेट हवेत गोळीबार केल्याची घटना अंबाजोगाई शहरात दोन दिवसांपूर्वी घडली आहे. काही मित्रांनी नवरदेवाला खांद्यावर घेतले आणि डान्स करायला सुरुवात केली. नवरदेवाने हातात बंदुक घेऊन थेट दोन वेळा हवेत गोळीबार केला.
बीड : हळदीच्या समारंभात बंदुक घेऊन शायनिंग मारणे एका नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. हळदीच्या कार्यक्रमात नाचताना उत्साहाच्या भरात नवरदेवा (Groom)ने हवेत गोळीबार (Firing) केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीच मांडवात एन्ट्री घेतली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. अंबाजोगाई पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. ज्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आला त्या बंदुकीचा पोलिस शोध घेत आहेत. (Firing in the air by Groom during the haldi ceremony in Beed)
नवरदेवाकडून दोन वेळा हवेत गोळीबार
लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवाने उत्साहाच्या भरात थेट हवेत गोळीबार केल्याची घटना अंबाजोगाई शहरात दोन दिवसांपूर्वी घडली आहे. काही मित्रांनी नवरदेवाला खांद्यावर घेतले आणि डान्स करायला सुरुवात केली. नवरदेवाने हातात बंदुक घेऊन थेट दोन वेळा हवेत गोळीबार केला. तर त्याआधी नवरदेवाच्या एका मित्राने गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाला नाही. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. नवरदेवाकडील आडनाव हे चाटे असल्याचे समजते मात्र अद्याप त्याचे नाव कळले नाही.
नांदेडमध्ये गोळीबार प्रकरणी चार सराईत गुन्हेगार अटक
नांदेडमध्ये रंगपंचमीच्या दिवशी गोळीबार करणाऱ्या चौघांना पाठलाग करून पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेले चारही आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सगळे शहर रंगपंचमी साजरी करत असताना माळटेकडी उड्डाणपूलावर दीपक बिगाणिया या युवकांवर अज्ञात आरोपींनी गोळी झाडली होती. त्यात दिपक हा जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत चौघांना अटक केली. (Firing in the air by Groom during the haldi ceremony in Beed)
इतर बातम्या
VIDEO : अहमदनगरमध्ये सरफेस कोटिंग ऑइल कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान
Watch Video | शिरूर तालुक्यात अपघातानंतर ‘बर्निंग कारचा थरार’ ; व्हिडीओ व्हायरल