माझं लेकरु अपघातानं गेलं नाही, त्याची चौकशी करायला पाहिजे; विनायक मेटेंच्या मातोश्रींची चौकशीची मागणी; जाणूनबुजून मारल्याची संशय

पुणेः शिवसंग्रामचे नेते तथा माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे रविवारी पहाटे (Accident) कार अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या या निधनामुळे राजकीय वर्तुळासह सामाजिक चळवळीतील अनेकांना त्यांच्या या निधनामुळे धक्का बसला आहे. ज्याप्रमाणे राजकीय आणि सामाजिक चळवळीतील लोकांना त्यांच्या निधनाचा धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयानाही प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे. विनायक मेटे […]

माझं लेकरु अपघातानं गेलं नाही, त्याची चौकशी करायला पाहिजे; विनायक मेटेंच्या मातोश्रींची चौकशीची मागणी; जाणूनबुजून मारल्याची संशय
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 6:41 PM

पुणेः शिवसंग्रामचे नेते तथा माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे रविवारी पहाटे (Accident) कार अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या या निधनामुळे राजकीय वर्तुळासह सामाजिक चळवळीतील अनेकांना त्यांच्या या निधनामुळे धक्का बसला आहे. ज्याप्रमाणे राजकीय आणि सामाजिक चळवळीतील लोकांना त्यांच्या निधनाचा धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयानाही प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे. विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले असले तरी या अपघाताची बारकाव्याने चौकशी व्हावी अशी मागणीही अनेकांनी केली आहे. त्याचप्रमाणे विनायक मेटे यांच्या मातोश्रीनीही (Viayak Mete Mother) माझं लेकरु अपघातानं गेलं नाही, त्याची चौकशी करायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता विनायक मेटे यांच्या अपघाताला वेगळेच वळण लागले आहे.

शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार असलेले विनायक मेटे बीडहून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला असल्याने विनायक मेटे यांच्या आईने त्यांच्या निधनानंतर भावनिक उद्गगार काढत माझं लेकरु मरायसारखा नव्हता, जाणून बुझून माझं लेकरु मारलं असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

ठरवून अपघात केला

विनायक मेटे यांचा अपघात हा ठरवून केला असल्याची टीका त्यांच्या आईने केली असून त्यांच्या निधनानंतर त्यांना जोरदार मानसिक धक्का बसला आहे. तर विनायक मेटे यांच्या पत्नीलाही मानसिक धक्का बसल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल केले गेले आहे. माजी आमदार विनायक मेटे यांच्याविषयी बोलताना त्यांच्या आईकडून भावनिक स्वरात सगळा त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय प्रवास सांगितला. यावेळी सांगताना त्या म्हणाल्या की, विनायकचा अती लाड करायचे, तरीही त्याचा लाड हा जास्तच असायचा. मेटेंविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, तो कधी उलट बोलला नाही.

शिक्षण ते नोकरी प्रवास

माजी आमदार विनायक मेटे यांच्या शैक्षणिक वाटचालीविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, विनायकच्या शिक्षणासाठी चौथीला त्याला कळंबला टाकले होते, त्यानंतर तो नववीपर्यंत कळंबलाच शिकला. तिथेच राहून त्याने मॅट्रीक परीक्षा पास झाला, त्यानंतर त्याला आम्ही त्याला म्हणायचो बारावीपर्यंत कॉलेज कर चांगली नोकरी लागेल पण त्यानंतर त्यांनी मुलुंडला बँकेत नोकरी पत्करली. त्यावेळी त्यांचा 12 हजार पगार होता.

नोकरी करत करत शिक्षण केलं

बँकेत नोकरी करतानाही त्यांनी शिक्षणाची आस सोडली नव्हती. म्हणून नोकरी लागूनही आपल्याला पुढं शिकायचं आहे असं म्हणत ते पुढं शिकत राहिले, त्यानंतर त्यांनी पुढचं तीन वर्षे शिक्षण केले असले तरी त्यासाठी त्यांनी पैसा मागितला नाही. शिक्षण शिकत असताना बिगारी, कलरचही काम त्यानी केलं असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजीविक्रीही केली

आपला मुलगा अपघातात गेल्यावर समजल्यावर विनायक मेटे यांची आई प्रचंड भावनिक होऊन त्यांनी विनायक मेटेंचा सगळा प्रवास भावविवश शब्दात त्यांनी सांगितला त्या म्हणाल्या की, माझ्या लेकानं भाजी विकली, कलर काम केलं. बारका मुलगा कारखान्यात 100 रुपये महिन्यान जायचा त्याकाळात त्यांनी तसे दिवस काढले. त्यानंतर त्यांनी भाजी विक्रीचाही व्यवसाय केला त्यावेळी त्या म्हणाल्या की, भाजी विकलेली मला आवडलं नाही. मग त्यानी ते बंद करून आम्ही गावाकडे आलो. काही दिवस 5-6 महिने डोंबिवलीत राहिलो. दुष्काळ पडला तेव्हा खडी फोडली पण लेकरं शाळातली काढली नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार होईल असं वाटलं नाही

कधी विनायक आमदार होईल असं कधीच वाटलं नव्हतं, पहिल्यांदा आमदार झाला तेव्हा मला चालायचं सुधारलं नाही. त्यावेळी त्याचे कार्यकर्ते घरी यायचे तेव्हा स्टोहवर भाकरी करायचे असंही त्यांनी आपल्या परिस्थितीविषयी सांगितले. विनायक मेटे कुठेही बाहेर असले तरी ते दिवसभरात मला दोनदा फोन करायचा, जरा उशिर झाला की फोनवरच उशिर होईल असंही ते सांगायचे.

उत्तम खव्वय्येही

विनायक मेटे राजकारण आणि समाजकारणात जसे सक्रीय होते, तसेच ते उत्तम खव्वय्येही होते. त्यांना दाळीचा वडा, मासवड्या, ठेचा, हरभाऱ्याची भाजी त्यांना विशेष आवडायची. काल त्याच्यासाठी वडा केला होता, गुलाबजामून केले होते मात्र तळलेलं काही पदार्थ ते खात नव्हते. पुरणाची पोळीही त्यांना विशेष आवडायची.

माझं लेकरु अपघाताने गेलं नाही

काल दुपारी 4 वाजता ते आपल्या आईला भेटून आले होते, त्यावेळी माझे पाय दुखत होते, तेव्हा त्यानी पाय पाहिला आणि म्हणाला 22 तारखेला दवाखान्यात घेऊन जातो असंही त्यांनी सांगितले होते, 22 तारखेला येतो असंही त्यांनी सांगितले होते. मात्र विनायक मेटेंचा अपघात झाला त्यारात्री मी झोपले नाही, मला झोप लागत नव्हती, काहीच सुधारत नव्हतं, टीव्ही पाहू वाटत नव्हती, सकाळी बाहेरचं झाडून काढलं होतं त्यावेळी आपल्याला उदास वाटत होतं, त्यानंतर आम्ही सकाळी मुंबईला आलो, मात्र त्यांच्या निधनाची बातमी आपल्याला कोणी सांगितले नव्हतं, त्यामुळे माझी मागणी आहे की, माझं लेकरु अपघाताने गेलं नाही, त्याची चौकशी करायलाच पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.