AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Abortion Case : बीड अवैध गर्भपात प्रकरण, मुख्य आरोपी शिकाऊ डॉक्टरला अमहदनगरमधून अटक

गर्भपातानंतर महिलेला अतिरक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे तिचा पती, सासू, सासरे आणि भावाने तिला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र महिलेची गंभीर अवस्था पाहता खाजगी रुग्णालयाने महिलेला अॅडमिट करण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिचा गर्भपात झाल्याचे डॉक्टरांना कळले.

Beed Abortion Case : बीड अवैध गर्भपात प्रकरण, मुख्य आरोपी शिकाऊ डॉक्टरला अमहदनगरमधून अटक
बीड अवैध गर्भपात प्रकरण, मुख्य आरोपी शिकाऊ डॉक्टरला अमहदनगरमधून अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 5:01 PM

बीड : बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपात (Illegal Abortion) प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर येथील एका शिकाऊ डॉक्टर (Trainee Doctor)ला अटक (Arrest) केली आहे. सतिश सोनवणे असे मुख्य सुत्रधाराचे नाव आहे. बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील सीता गाडे या महिलेचं चौथ्यांदा गर्भपात करताना अतिरक्तस्त्राव होऊन 5 जून रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारे रॅकेट असल्याचं उघड झालं. अखेर पोलिसांनी सूत्र फिरवत या प्रकरणी एक अंगणवाडी सेविका, मृत महिलेचा पती, सासरा, भाऊ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आता मुख्य सूत्रधार शिकाऊ डॉक्टर सतिश सोनवणे याला अटक केली. सध्या या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असून यामागे कोणाचा वरदहस्त याची चौकशी सुरू आहे.

काय आहे प्रकरण ?

बक्करवाडी येथील सीता गाडे या महिलेला आधीच मुली होत्या. त्यानंतर ती चौथ्यांदा गरोदर होती. मात्र एका महिला एजंटच्या माध्यमातून त्यांनी गर्भलिंग चाचणी केली असता चौथीही मुलगी असल्याचे तिला कळाले. त्यानंतर एका लॅब टेक्निशियनच्या मदतीने सीता गाडे हिचा गर्भपात करण्यात आला. महिलेच्या शेतातील गोठ्यात गर्भपात करुन गर्भ जाळण्यात आला. मात्र गर्भपातानंतर महिलेला अतिरक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे तिचा पती, सासू, सासरे आणि भावाने तिला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र महिलेची गंभीर अवस्था पाहता खाजगी रुग्णालयाने महिलेला अॅडमिट करण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिचा गर्भपात झाल्याचे डॉक्टरांना कळले. याच दरम्यान महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. यानंतर महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. आणि त्यानंतर गर्भपाताची चौकशी करण्यात आली.

गर्भपाताची चौकशी सुरु केल्यानंतर अवैध गर्भपाताचे रॅकेट उघड झाले. यानंतर महिलेच्या कुटुंबीयांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी प्रथम बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या महिला एजंटला ताब्यात घेतले. त्यानंतर गर्भपातासाठी डॉक्टरकडे नेणाऱ्या लॅब टेक्निशियनला पोलिसांनी अटक केले. या टेक्निशियनची चौकशी केली असता एका नर्सचे नाव उघड झाले. पोलिस जेव्हा या नर्सला अटक करण्यासाठी तिच्या घरी पोहचले, तेव्हा सदर महिला गायब असल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर महिलेचा तपास करताना असतानाच धरणात एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जाऊन खातरजमा केली असता तो मृतदेह आरोपी नर्सचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत एक एक धागा जोडत अखेर मुख्य आरोपीपर्यंत पोहचले. (Main accused trainee doctor arrested from Ahmednagar in beed illegal abortion case)

हे सुद्धा वाचा

मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त म्हणून.. ; राऊतांचा विरोधकांना टोला
मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त म्हणून.. ; राऊतांचा विरोधकांना टोला.
भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली
भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली.
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट.
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.