Beed Firing : बीडमध्ये अज्ञाताकडून गोळीबार, एक जण जखमी; आरोपीला गावकऱ्यांकडून चोप

माजलगाव तालुक्यातील तालखेड या ठिकाणी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास साखर कारखान्याचे काम थांबल्याने काही युवक आनंदाने नाचत होते. तेवढ्यात परराज्यातील तीन ते चार जण एका जीपमधून तिथे आले. त्यातील एका व्यक्तीने अचानक खाली उतरून रस्त्यावर नाचणाऱ्या युवकांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्या व्यक्तीने युवकांवर गोळीबार केला.

Beed Firing : बीडमध्ये अज्ञाताकडून गोळीबार, एक जण जखमी; आरोपीला गावकऱ्यांकडून चोप
बीडमध्ये अज्ञाताकडून गोळीबार, एक जण जखमीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 11:00 PM

बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे परराज्यातून आलेल्या एका व्यक्तीने गोळीबार (Firing) केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे काही तरुण नाचत होते. या तरुणांवर जीपमधून आलेल्या अज्ञातांपैकी एकाने गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी (Injured) झाला आहे. जखमी युवकाला बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचारा (Treatment) साठी दाखळ करण्यात आले आहे. साहेबराव जाधव असे गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. गोळीबार करणाऱ्यास गावकऱ्यांनी कपडे काढून बेदम चोप दिला. तर जीपमधील अन्य लोक पळून गेले. दरम्यान आरोपी कुठून आले ? त्याने हा गोळीबार का केला ? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गोळीबार करणाऱ्याला नागरिकांकडून चोप

माजलगाव तालुक्यातील तालखेड या ठिकाणी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास साखर कारखान्याचे काम थांबल्याने काही युवक आनंदाने नाचत होते. तेवढ्यात परराज्यातील तीन ते चार जण एका जीपमधून तिथे आले. त्यातील एका व्यक्तीने अचानक खाली उतरून रस्त्यावर नाचणाऱ्या युवकांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्या व्यक्तीने युवकांवर गोळीबार केला. यात एक युवक गंभीर जखमी झाला. दरम्यान, ही घटना गावात कळताच गावातील युवक तेथे जमले. त्यांनी रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावून जीप अडवली. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीस गाडीतून खेचत जमावाने त्याचे कपडे काढून बेदम चोप दिला. जीपमधील अन्य जण पळून गेले. गोळीबारात साहेबराव जाधव गंभीर जखमी झालेला आहे. (Unidentified gunmen Firing on youths in Beed, one person injured)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.