Walmik Karad : इतकं महाभारत घडूनही वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष; मंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून पुन्हा वाद, बीडमध्ये चाललंय काय?
Walmik Karad Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या निकषावरून गदारोळ सुरू असतानाच आता बीडमध्ये नव्या वादाला फोडणी बसली आहे. खंडणीप्रकरणात शरण आलेल्या वाल्मिक कराडवरून हा नवीन वाद ओढावला आहे, काय आहे हे प्रकरण?
लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी मंडळीच या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठं अरिष्ट ओढावल्याचे छाती बडवून सांगत आहेत. निकष बदलाच्या चर्चेवरून लाडकी बहीण योजना चर्चेत असतानाच बीडमध्ये नवीन वादाची या योजनेला फोडणी बसली आहे. खंडणीप्रकरणात शरण आलेला वाल्मिक कराड या वादाच्या केंद्रस्थानी आहे. काय आहे हे प्रकरण?
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष
लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेल्या वाल्मीकचे या योजनेचे अध्यक्ष पद कायम असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तो परळी येथील लाडकी बहीण योजना समितीच्या पदावर अजूनही कायम आहे.
विशेष म्हणजे ज्यांच्या राजीनाम्याची गेल्या एक महिन्यांपासून मागणी करण्यात येत आहे असे मंत्री धनंजय मुंडे यांनी कराडच्या नावाची शिफारस केल्याचे उघड झाले आहे. पालकमंत्री असताना त्यांनी या समितीच्या अध्यक्षपदी वाल्मिकची शिफारस केली होती. कराड याच्यावर 14 गुन्हे असतानाही त्याला या योजनेचे पद बहाल करण्यात आले. त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
तर वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ
मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड शरण आला आहे. वाल्मीक कराड सध्या नऊ दिवसांपासून सीआयडीच्या कोठडीत आहे. CID कडून आज त्याची व्हॉईस सॅम्पल घेण्याची शक्यता आहे. व्हाईस सॅम्पल जुळल्या नंतर वाल्मीक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना उलटला आहे. या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड शरण आला आहे. हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. घटनेचा तपास CID आणि SIT कडून सुरू आहे. तपासात स्थानिक गुन्हे शाखा देखील सहभागी आहे.
गुन्हे शाखेकडून सात आरोपींना अटक
जयराम माणिक चाटे
महेश सखाराम केदार
प्रतिक घुले
सुदर्शन घुले
सुधीर सांगळे
विष्णू चाटे